Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

फक्त 10 मिनिटे बस्स; कोणत्याही सबस्क्रिप्शनशिवाय असा पहा ‘ब्रह्मास्त्र’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 4, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Brahmastra
0
SHARES
78
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ने बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडची नांगी मोडल्याचे पहायला मिळाले. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केल्याचे समोर आले होते. दरम्यान अनेक प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता आला नाही. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यायोग्य आहे का नाही..? हे त्यांना इतरांनी दिलेल्या रिव्हूवरून ठरवावे लागत आहे. पण आता असं करायची गरज नाही. कारण आजपासून तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट मोफत पाहू शकणार आहात. पण कसा..? तर नियम आणि अटींच्या पूर्ततेनंतर. जाणून घ्या इतर महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे:-

View this post on Instagram

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

ज्या लोकांनी अजूनही रणबीर आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट पाहिलेला नाही. ते आजपासून म्हणजेच ४ नोव्हेंबर २०२२ पासून डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकणार आहेत. पण.. पण.. पण.. फक्त १० मिनिटे. होय हा चित्रपट तुम्ही सुरुवातीची १० मिनिटे अगदी मोफत पाहू शकाल. यानंतर तुम्हाला चित्रपट आवडला तरच तुम्ही सबस्क्राईब करा. पण चित्रपट १० मिनिटांतच फुसका आहे असं वाटलं तर सबस्क्राईब करायची गरजच नाही. तुम्हाला फक्त डिस्नी प्लस हॉटस्टार डाऊनलोड करायचा आहे आणि ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची सुरुवातीची १० मिनिटे पाहून चित्रपट पाहायचा का नाही हे ठरवायचं आहे.

View this post on Instagram

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

ही मोफत स्ट्रिमिंग आजपासूनच सुरू झाली असून याबाबत चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी याने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ब्रह्मास्त्र पाहण्यासाठी बरेच लोक उत्सुक आहेत. पण केवळ १० मिनिटे चित्रपट काय पाहायचा म्हणून तुमचा संताप होऊ शकतो. पण मित्रांनो., हि १० मिनिटे फार महत्वाची आहेत. कारण या दहा मिनिटांमध्ये तुम्हाला ब्रह्मास्त्र चित्रपटातील महत्त्वपूर्ण सीन्स पहायला मिळणार आहेत. सोबत यातील शाहरुख खानचा कॅमिओसुद्धा पहायला मिळणार आहे. त्यामुळे म्हणायला दहा मिनिटं जरी कमी वाटत असली तरी पुढचा चित्रपट पहायचा का नाही हे ठरवण्यासाठी हुशार प्रेक्षकांना केवळ १० मिनिटे बस्स आहेत.

Tags: Aalia Bhattayan mukherjeeBrahmastra Part One ShivaDisney Plus HotstarOTT Releaseranbir kapoor
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group