Take a fresh look at your lifestyle.

‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय; ‘समरेणू’तून उलघडणार एक अनोखी प्रेमकहाणी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय…’ अशा अनोख्या टॅगलाईनच्या माध्यमातून लोकांचे लक्ष वाढणारा आणि एक अनोखी प्रेमकहाणी सांगणारा ‘समरेणू’ हा आगामी चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. तशी सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. ‘समरेणू’ हा मराठी चित्रपट असून येत्या १३ मे २०२२ रोजी तो प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे अनोखे शीर्षक आणि टॅगलाईनने सिनेरसिकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. नुकताच ‘समरेणू’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

या टीझरमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी एकाच वाटेने चालत आहेत. मात्र एकमेकांच्या विरूद्ध दिशेने. त्यामुळे या चित्रपटाचे कथानक काय असेल याबाबत वेगळीच उत्सुकता आहे. अद्याप या चित्रपटातील कलाकारांची नावे समोर आलेली नाहीत मात्र एकंदरच ही एक प्रेमकहाणी असल्याचे दिसत आहे. सुरूवात महत्वाची नसलेल्या या प्रेमकहाणीचा शेवट काय असेल असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. ‘समरेणू’ या चित्रपटातील गाणी गीतकार गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली असून कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले या सुप्रसिद्ध गायकांनी या गाण्यांना आवाज दिला आहे.

एम. आर. फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन महेश डोंगरे यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती एम. आर. फिल्म्स वर्ल्डची आहे. तर प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत. तर सूरज आणि धीरज यांनी चित्रपटाला संगीत प्रदान केल आहे. या चित्रपटातील गाणी गीतकार गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. तर सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांनी या गाण्यांना आपले आवाज दिले आहे.