Take a fresh look at your lifestyle.

समाजाविरुद्ध बंड पुकारणाऱ्या ‘रिवणावायली’ची कथा; पहा ट्रेलर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपला समाज सुधारला असं कितीही वाटत असलं तरी समाजातील काही रूढी आणि परंपरा या रुजलेल्या असतात. ज्या प्रगत बुद्धीला कधीच पटत नाहीत. समाज कितीही पुढारलेला असला तरी स्त्रीला आजही तिच्या हक्कासाठी आणि तिच्या स्वातंत्र्यासाठी लढावं लागत. असाच एक लढा आता रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांसाठी येतोय. या आगामी मराठी चित्रपटाचे नाव ‘रिवणावायली‘ असे आहे. या चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.

रिवणावायली या चित्रपटाचे संगीत पार्थ उमराणी यांचे असून चित्रपटातील गीत वैभव देशमुख यांनी लिहिले आहे. तर या चित्रपटात अक्षया गुरव, शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, आकाश नलावडे, संतोष राजे महाडिक, प्रताप सोनाली आणि कल्याणी चौधरी या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. याचे शीर्षक इतके अनोखे आहे कि सगळ्यांसाठी आकर्षणाचे कारण ठरले आहे. रिवण म्हणजे वर्तुळ आणि वायली म्हणजे वेगळं. एका वर्तुळात आयुष्य न जगता त्याच्यापासून वेगळं होऊन जगणाऱ्या एका स्त्रीची गाथा आणि समाजाविरुद्ध बंड पुकारणाऱ्या रिवणावायलीची हि गोष्ट आहे.

‘बिटरस्वीट’ या चित्रपटासाठी अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात पारितोषिक जिंकलेली अभिनेत्री अक्षया गुरव ही या चित्रपटातील मुख्य भूमिकेत आहे. जगात एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी झगडणारी ‘ऐश्वर्या देसाई’ या बंडखोर मुलीची ही कथा आहे. येत्या ८ एप्रिल २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक डॉ. दिनेश कदम यांचे आहे. तर छायाचित्रण धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. संगीत पार्थ उमराणी यांचे असून गीत वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत.