हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या घरात सध्या टास्क जिंकण्यासाठी जो तो चुरशीने लढताना दिसत आहे. दरम्यान या आठवड्यात कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ हे साप्ताहिक कार्य सोपविण्यात आले होते. नावाप्रमाणे टास्क भन्नाट होता स्पर्धकांनी त्याचा राडा केला. दरम्यान घरातील सदस्यांनी बिग बॉसच्या नियमांची पायमल्ली केली. यामुळे संतप्त बिग बॉस यांनी सदस्यांची कडक शब्दात निंदा केली. इतकेच नव्हे तर विशाल, गायत्री आणि स्नेहा यांना त्याचे परिणाम देखील भोगावे लागले. बिग बॉसने थेट या तिघांनाही पुढील आठवड्यासाठी नॉमिनेट केले आहे. दरम्यान हे सगळे राडे एका बाजूला आणि मीराचे अश्रू एका बाजूला. होय मीराला तिचे अश्रू अनावर झाले आणि ती ढसाढसा रडताना दिसली.
एकीकडे घरात हे राडे सुरु असताना मीरा गायत्रीसोबत बोलून तिचं मनं मोकळं करताना तिला तिचे अश्रु अनावर होऊन ती रडताना दिसते आहे. आता मीरा का रडतेय हे तर ‘बिग बॉसचा हा एपिसोड पाहिल्यावरच समजेल.या प्रोमोमध्ये मीरा गायत्रीला म्हणताना दिसतेय कि, ‘मला ऐकवायचे आहे… नाहीतर भांडायचे आहे… मला काहीतरी बोलायचे आहे, नाहीतर नाही होणार माझ्याकडून, माझ्या मनामधून नाही निघणार… नाही सहन होतं….’ हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र अलग प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यावर एका नेटकाऱ्याने म्हटले आहे कि, म्हणजे भांडली नाही तर हिला त्रास होतो. तर अन्य एकाने लिहिलं कि, मगरमच्छ के आंसू विशाल नॉमिनेट झाला तेव्हा किती खुश झालेली रड आता. तर आणखी एकाने लिहिले कि, रोज तर भांडण करते आणि फालतूंच इमोशनल ड्रामा करते… ‘बिग बॉस सीजन ३ ची ड्रामा क्वीन आहे मीरा. तर आणखी एका नेटकाऱ्याने लिहिले आहे कि, आम्हालाही, नाही सहन होतं…तुमची नाटकं, मिश्किल हसणं, फालतूमध्ये उड्या मारणं आणि चावडीवर मी नाही काही केलं सर, मी तर काहीच बोलली नाही नाही सर, असं नाहीये सर… नको अंत पाहू बाई… त्यापेक्षा तू नॉमिनेट हो आणि घराबाहेर हो!