हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत लोकप्रिय आणि बहुचर्चित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या पॉलिटिकल ड्रामा असलेल्या वेबसीरिजचा पहिला आणि दुसरा सिझन तुफान गाजला होता. यानंतर आता ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा सीजन ३ येऊ घातला आहे. ज्याबाबत प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. राजकारणाची पार्श्वभूमी असलेली ही वेबसीरिज तिसऱ्या भागासह येत्या २६ मे २०२३ पासून पुन्हा एकदा मनोरंजन करणार आहे. अलीकडेच या सिरीजचा टिझर रिलीज झाला आहे. जो पाहून सिरीजबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
हा टिझर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, ‘मजाक बना के रखा है राज्य के पॉलिटिक्स का.. हर कोई फटाफट पार्टी बदल रहा है. जब अपने सगेही कुर्सी खिचने लगते हे तो.., अभी तो इस राज्य की संगीत कुर्सी मै राजधानी को भी मौका चाहिए, लेकीन इस राज्य रिमोट कंट्रोल दिल्लीसे हमेशा दूर ही रहेगा, ये वादा है… एक गायकवाड का…. तुम्हारा साहेब अभी रिटायर नहीं हुआ हे। असे दमदार डायलॉग या टीझरमध्ये पहायला मिळत आहेत. हे डायलॉग्स याबाबत इतकी उत्सुकता वाढवत आहेत तर सिरीज किती दमदार असेल याचा अंदाज लावणे मुश्किल नाही.
सत्तेसाठी भुकेलेले शक्तिशाली गायकवाड आता ‘सिटी ऑफ ड्रीम्स- ३’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. यावेळी पुन्हा एकदा काही अनपेक्षित ट्वीस्ट पहायला मिळणार आहेत. हा सीजन या सिरीजचा शेवटचा सीजन असण्याची शक्यता आहे कारण यामध्ये आता सत्तेसाठीचा अंतिम लढा पहायला मिळणार आहे. ही सिरीज डिस्ने + हॉटस्टारवर पाहता येणार आहे. या वेब सीरीजमध्ये प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर, सुशांत सिंग, एजाज खान, रणविजय सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
Discussion about this post