Take a fresh look at your lifestyle.

इंस्टाग्राम वर आधारित वेब सिरीज फर्स्ट्सने केला विक्रम मिळाले २.६ करोड़ व्यूज़

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । इंस्टाग्राम वर आधारित वेब सीरिज फर्स्ट्सने आतापर्यंत २६ दशलक्ष व्यूज़सह विक्रम केला आहे. हे इंस्टाग्राम तसेच युट्यूब आणि फेसबुकवर पाहिले गेले आहे. फक्त इंस्टाग्रामवर त्याना १६ दशलक्ष व्यूज़ मिळाली. या मालिकेत रोहन शाह आणि अपूर्व अरोरा आहेत.

या सीरीजविषयी बोलताना दिग्दर्शक नयना श्याम म्हणाली, “या सीरीजची चांगली कामगिरी पाहून आम्हाला संपूर्ण टीमने केलेल्या प्रयत्नांचा अभिमान वाटतो. मी खरोखरच नम्र आहे कि प्रेक्षकांनी रोहन आणि अपूर्व यांच्या फर्स्ट्सला तेवढेच प्रेम दिले जेवढे प्रेम आम्ही ते तयार करताना दिले. “

शाळेच्या दिवसांच्या रोमांसबरोबरच ही मालिका लोकांना त्यांच्या भूतकाळाची आठवण करून देईल.ही वेब सीरिज याक्षणी खूप लोकप्रिय झाली आहे आणि प्रत्येक एपिसोड च्या कमेंट सेक्शनकडे पाहून ते ओळखले जाऊ शकते. या सिरीजला आतापर्यंत ८,००० हून अधिक कमेंट मिळाल्या आहेत, त्यातील बर्‍याच जणांनी आपला दुसरा सीझन आणण्याची मागणी केली आहे.

Comments are closed.