Take a fresh look at your lifestyle.

मिर्झापूर-2 चा ट्रेलर आज होणार प्रदर्शित ; पहा कुठे बघू शकता ही वेबसिरीज

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | आज सर्वात लोकप्रिय मिर्झापूर सीरीजचा पुढचा पार्ट ‘मिर्झापूर 2’चा ट्रेलर रिलीज होणार आहे. ‘मिर्झापूर 2’ मध्ये गुड्डू पंडित, कालीन भैय्या आणि मुन्ना भैय्या यांच्यावर भारी पडणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर दुपारी एक वाजता ‘मिर्झापूर 2’चा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे.

वेब सीरीज मिर्झापूरचा सीझन 2 मध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी कालीन भैय्या, अली फजल गुड्डू, दिव्येंदु शर्मा मुन्ना भैय्या या भूमिकेत दिसणार आहे. याव्यितिरक्त श्वेता त्रिपाठी गोलूची भूमिका साकारणार आहे. उत्तर भारतातील मिर्झापूर या भागात होणारे गुन्हे आणि गुन्हे जगतातील भयानक सत्य या सीरिजच्या पहिल्या भागात दाखविण्यात आले होते.

उत्तम पटकथा, संवाद आणि विषयाच्या उत्तम मांडणीमुळे प्रेक्षकांनी पहिल्या सिरीजला उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याच विषयाला पुढे नेणारे ‘मिर्झापूर’चे दुसरे पर्व अधिक रोमांचक आणि उत्तम बनले आहे. अमित सियाल, अंजुम शर्मा , शिबा चड्डा, मनू ऋषी चड्डा आणि राजेश तेलंग यांसारख्या कलाकारांसोबतचा हा अॅक्शन पॅक प्रेक्षकांना आता ड्रग्स, ऍक्शन आणि जगण्यासाठीचा थरारक लढा याचा अनुभव देणार आहे.

Comments are closed.