Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूडमध्ये लगीनसराई; बी-टाऊन कपल विकी- कॅट, आलिया- रणबीर लग्नबेडीत अडकणार?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लग्नाचा मोसम सुरू झाला आहे. लग्नाचा हा सीझन सुरू होताच बॉलिवूडमधील लव्ह बर्ड्सची चांगलीच चर्चा रंगली आहे.  लग्नाच्या चर्चेदरम्यान बी-टाऊनचे हिट कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे.  आलिया-रणबीरचे लग्न बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा भाग बनले आहे. गेल्या वर्षीही आलिया – रणबीरच्या लग्नाबाबत बातम्या आल्या होत्या. मात्र कोरोनामुळे त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला अशी बातमी आली. पण आता या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया आणि रणबीर दीर्घ प्रतीक्षेनंतर यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. आलिया-रणबीर इटलीमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचेही बोलले जात आहे. आलिया-रणबीरच्या लग्नाला फार कमी लोकं उपस्थित राहणार आहेत. त्यात दोन्ही कुटुंबातील काही लोकांची आणि काही खास मित्रांची नावे आहेत. वास्तविक, अशी बातमी आली आहे की, ‘ब्रह्मास्त्र’ नंतर रणबीर कपूर त्याच्या आगामी ‘एनिमल’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार होता. मात्र त्याने त्याचे वेळापत्रक जानेवारी 2022 पर्यंत पुढे ढकलले आहे. या चित्रपटात रणबीरसोबत परिणीती चोप्रा, अनिल कपूर, बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

त्याचवेळी, विकी कौशल आणि कतरिना कॅटरिना एंगेजमेंटनंतर, दोघेही डिसेंबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची बातमी आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सब्यसाची या दोघांच्या लग्नाचे कपडे डिझाइन करत आहे.

हे दोघेही सध्या फॅब्रिक निवडत आहेत. कतरिनाने तिच्या आउटफिटसाठी रॉ सिल्क नंबर निवडले आहे, जो लेहेंगा असेल. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्न होणार आहे. या प्रकरणी दोघांनीही आतापर्यंत मौन बाळगले आहे.