Take a fresh look at your lifestyle.

वेस्ट बंगालच्या निलांजनाने जिंकली झी टीव्ही’च्या ‘सा रे ग म प’ची ट्रॉफी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिंदी वाहिनी ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प २०२१’ या सिंगिंग रिअॅलिटी शोचा नुकताच ग्रँड फिनाले सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. त्यानंतर झी टीव्ही’ला ‘सा रे ग म प २०२१’ या सीझनची विजेती मिळाली आहे. होय विजेती. कारण सर्वाधिक मतांसह वेस्ट बंगालच्या नीलांजनाने या पर्वाचे विजेतेपद पटकावले आहे. यानंतर तिला ‘सा रे ग म प’च्या प्रतिष्ठित ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. सोबतच रोख बक्षीस म्हणून १० लाख रुपयांचा धनादेशही देण्यात आला आहे. तर राजश्री बाग आणि शरद शर्मा यांना शोचे प्रथम आणि द्वितीय उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले. राजश्रीला रोख बक्षीस म्हणून ५ लाख रुपये, तर शरद शर्माला रोख बक्षीस म्हणून ३ लाख रुपये देण्यात आले.

आपल्या विजयाचा आनंद व्यक्त करताना नीलांजनाने माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान नीलांजना म्हणाली कि, ‘सा रे ग म पा २०२१ जिंकून मला खूप आनंद झाला आहे आणि माझ्या या प्रवासात मला मिळालेल्या कौतुक आणि प्रेमाबद्दल मी प्रेक्षकांची अत्यंत आभारी आहे. हा माझ्यासाठी असा क्षण आहे जो मी कधीही विसरणार नाही. मला अजूनही विश्वास बसत नाहीये की, माझा हा अद्भुत प्रवास संपला आहे. सा रे ग म पा’ चा संपूर्ण अनुभव माझ्यासाठी खूपच समृद्ध करणारा आहे.’

पुढे म्हणाली की, या प्रवासात मला जज, मार्गदर्शकांकडून खूप काही शिकायला मिळाले. आमच्या शोच्या सर्व ज्युरी सदस्यांनी दिलेला अभिप्राय नेहमीच खूप प्रेरणादायी ठरला आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी या मंचावर घालवलेले सर्व मौल्यवान क्षण मी खूप खूप जपून ठेवीन. माझ्या सोबत स्पर्धक म्हणून जोडले गेलेले प्रत्येकजण आज माझे मित्र मैत्रीण झाले आहेत आणि याचा मला खूप आनंद आहे. आमच्या सेटवरील प्रत्येकजण माझ्यासाठी कुटुंबातील सदस्यासारखा आहे आणि मला स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी दिल्याबद्दल मी झी टीव्हीचे आभार मानू इच्छिते!