‘वॉट एन आइडिया’; भन्नाट कॅप्शन सुचविणाऱ्या नेटकऱ्यांसाठी अनुपम खेर यांची खास ऑफर
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची लोकप्रियता आपण सारेच जाणतो. ते एक उत्तम अभिनेते असून त्यांनी साकारलेली जवळजवळ सर्व पात्रे अत्यंत लोकप्रिय आहेत. शिवाय अनुपम हे सोशल मीडियावर फार सक्रिय असल्याचे नेहमीच दिसते. यामुळे ते नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्टबाबत पोस्ट शेअर करताना दिसतात. कारण यामुळेच चात्यांच्या संपर्कात राहता येते असे ते म्हणतात. यानंतर त्यांनी नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि या फोटोसोबत नेटकऱ्यांना खास ऑफरसुद्धा दिली आहे.
अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनुपम खेर एका बाथटबमध्ये एखाद्या लहान मुलासारखे शिरून झोपलेले दिसत आहेत. मुख्य म्हणजे हा बाथटब लाकडी आहे. त्यामुळे हा फोटो अगदीच आकर्षणाचा विषय झाला आहे. अभिनेते अनुपम या लाकडी बाथटबमध्ये असे झोपले आहेत जसं एखाद लहान बाळ आईच्या कुशीत निपचित झोपलं आहे. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होताना दिसतोय. हा फजोतो शेअर करत अभिनेता अनुपम खेर यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, “मला हा फोटो प्रचंड आवडला, मला आशा आहे की तुम्हाला ही आवडेल. त्यामुळे या फोटोसाठी कॅप्शन तुम्ही सुचवा. यात ज्या ५ लोकांचं कॅप्शन आवडेल त्यांना मी घरी बोलवणार, असे वचन देतो”.
हि पोस्ट पाहून नेटकरी इतके खुश झाले आहेत कि काही विचारू नका. मुख्य म्हणजे अनुपम खेर यांच्या चाहत्यांना त्यांना भेटायची त्यातही त्यांच्या घरी जाऊन भेटायची संधी मिळणार आहे. हि बाब चाहत्यांसाठी खूप खास आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी कॅप्शन सुचवायला सुरुवातसुद्धा केल्याचे दिसत आहे. यात एक नेटकरी म्हणाला, “असं वाटतंय की बाळ आईच्या गर्भात आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “दिल तो बच्चा है जी.” याशिवाय तिसरा नेटकरी म्हणाला, “खेळ संपला की राजा आणि प्यादे एकाच पेटीत जातात.”अशा भरपूर कमेंट करत नेटकऱ्यांनी कॅप्शन सुचवले आहेत.