Take a fresh look at your lifestyle.

क्या हुआ भाई? तेजस्विनी पंडितच्या ‘#BanLipstick’ व्हिडीओमुळे नेटकरी पडले बुचकळ्यात

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेइंडस्ट्रीमधील अत्यंत लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हि नेहमीच आपल्या बोल्ड, बिंधास्त आणि हटके अंदाजामुळे सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांमध्ये चर्चेत असते. यानंतर आजही तेजस्विनी एका कारणामुळे चांगलीच चर्चेत आहे. पण हे कारण काही चित्रपट नाही. याशिवाय तीच असं कोणतं व्यक्तव्यसुद्धा नाही. तर तिने केलेली इंस्टा पोस्ट आज फार चर्चेत आहे. तेजस्विनीने इंस्टाग्रामवर एक विडिओ शेअर केला आहे आणि यात तिने आपलं लिपस्टिकला समर्थन नसल्याचं म्हटलं आहे. यामुळे तिचे चाहते आणि अगदी सहकलाकारसुद्धा संभ्रमात पडले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तेजस्विनी हाताने लावलेली लिपस्टिक पुसून टाकते आणि म्हणते, मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही. बॅन लिपस्टिक! तर या व्हिडिओच्या कॅप्शनमध्येसुद्धा तिने बॅन लिपस्टिक असेच लिहिले आहे. यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. दरम्यान तिचे चाहते आणि सहकलाकार याना प्रश्न पडला आहे कि नेमकं झालं तरी काय? याशिवाय अनेकांनी तिचा हा व्हिडीओ आगामी चित्रपटाचं प्रमोशन असल्याचे म्हटले आहे. तसेच काही चाहत्यांनी फार काळजीने तेजस्विनीला काय झाले असे विचारले आहे..? पण या प्रश्नांवर तेजस्विनीने काही रिप्लाय दिलेला नाही.

तेजस्विनी पंडितचा हा बॅन लिपस्टिकचा व्हिडीओ पाहून सगळ्यात जास्त प्रश्न पडलेयत ते महिला चाहत्यांना. तेजस्विनीच्या अनेक महिला चाहत्यांनी तिला काय झाले मध्येच? असे प्रश्न विचारले आहेत. मात्र हे नक्कीच कोणत्यातरी नव्या चित्रपटाचे प्रमोशन असणार या अर्थाच्या कमेंट्सने सगळ्यात जास्त जोर धरला आहे. याशिवाय अनेकांनी ट्रोलिंगच्या हेतूने मग लावायची कशाला असेही म्हटले आहे.

इतकेच काय तर तिचं या व्हिडिओवर मराठी दिग्दर्शक संजय जाधव यांनीही कमेंट केली आहे. त्यांनी कमेंटमध्ये लिहिले कि, क्या हुआ भाई? तर नेटकऱ्यांनी मराठीमध्ये लिहिता येत नाही का? असे म्हणत संजय यांनाच ट्रोल केले. आता जोपर्यंत तेजस्विनी सांगत नाही तोपर्यंत या मागील संदर्भ काही लागणार नाही असेच दिसत आहे.