Take a fresh look at your lifestyle.

‘RRR’ म्हणजे काय? राजमौलींनी सांगितला शिर्षकाचा सरळ स्पष्ट अर्थ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बाहुबली चित्रपटाचे जगभरात कौतुक झाले. लोकांनी हा चित्रपट अगदी डोक्यावर उचलून घेतला. हा चित्रपट तयार करणाऱ्या एस. एस. राजमौलींचेही जगभरातून विविध क्षेत्रात कौतुक झाले. त्यामुळे बाहुबलीसारखा चित्रपट बनवणाऱ्या कलाकाराकडून लोकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे राजमौली लवकरच घेऊन येत असलेल्या ‘आरआरआर’ या चित्रपटाबाबत लोकं फारच उत्सुक आहेत या सगळ्यात लोकांचं अधिक लक्ष वेधले ते चित्रपटाच्या शीर्षकाने. अनेकांनी त्याचा अर्थ विचारला असता आता राजमौली यांनी उत्तर दिले आहे.

 

या नव्या वर्षात अर्थात २०२२ मध्ये राजमौलींचा ‘आरआरआर’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि तो पाहायला सर्व प्रेक्षकवर्ग आतुर आहे. तूर्तास या चित्रपटाचं प्रमोशन सुरू आहे. यानिमित्ताने ‘आरआरआर’ या चित्रपटाच्या शीर्षकाचा नेमका अर्थ काय? असे विचारणाऱ्या प्रत्येकाला उत्तर मिळाले आहे. मुख्य म्हणजे ‘आरआरआर’ या चित्रपटाच्या शीर्षकाचा खुलासा खुद्द राजमौली यांनी केला आहे.

राजमौली यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आरआरआर म्हणजे यातील पहिला R- Rise- उदय , दुसरा R – Roar – garjna आणि उरलेला शेवटचा R – Revolt – विद्रोह . या चित्रपटात मुख्य भूमिकेत, दाक्षिणात्य अभिनेता राम चरण तेजा, ज्युनिअर NTR दिसतील. तर यांच्यासह बॉलिवूड कलाकार अजय देवगण आणि आलिया भटदेखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत.