Take a fresh look at your lifestyle.

काहीही होउदे.. मी जाब विचारणारच..; चॅनेलच्या कडक भूमिकेनंतरही किरण मानेंचा कणा ताठ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध राजकीय आणि सामजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो मालिकेतुन हकालपट्टी करण्यात आली. आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच आपल्याला मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप किरण माने यांनी केल्यानंतर एकंदरच सर्व स्तरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर अखेर किरण मानेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना किरण माने यांनी सांगितले कि, उद्या शरद पवार- राहूल गांधी यांची सत्ता आली तरी मी जाब विचारणारच. कारण सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे हे सजग नागरिकांचे कर्तव्य आहे. मी फेसबुकवरून राजकीय भूमिका घेतो, यामुळे माझं काम थांबविण्यात आल्याची माहिती मला देण्यात आली. माझ्यासाठी हे धक्कादायक असले तरी मी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार मांडत आलो आहे आणि मांडत राहणार असे अभिनेता किरण माने यांनी सांगितले.

 

 

स्टार प्रवाह मराठी चॅनेलवरती मुलगी झाली हो या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चांगलीच चर्चेत आलेले विलास पाटील अर्थातच किरण माने यांनी केलेल्या राजकीय पोस्टवर त्यांना मालिकेतून काढण्यात आलेला आहे. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, काल ‘मुलगी झाली हो’ शूट सुरू असताना मला हिंदी प्रॉडक्शन्स हाउस मधून फोन आला की तुमच्यावर काहीजण नाराज असल्यामुळे तुम्हाला रिप्लेस केले जात आहे.

अभिनेता किरण माने म्हणाले, राजकारणावर बोलू नको, राजकारणावर लिहू नको हे बोलणे योग्य नाही, असे सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला, तुकाराम महाराजांना विरोध करणारे याच प्रवृत्तीचे लोक आहेत. बहुजन लोकांचे नाहीतर सामान्य लोकांचे यापुढील काळात जगणे अवघड होणार आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत आवाज उठवला नाही तर यापुढील काळात सामान्य व्यक्तीच्या सर्व गोष्टींवर बंधन येणारं आहे. कुणी माझ्या पाठीशी उभे राहू अगर ना राहू मी एकटाच लढणार आहे.

मला याधीही ट्रोल केले जात आहे. अश्लील अर्वाच्च भाषा वापरली जात आहे त्यांना वाटत आहे की मी खचलो आहे. हि विषारी भाषा दिवसेंदिवस वाढत चालली आहे याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे. यापुढील काळात मला बदनाम केलं जाणार आहे. खोटे आरोप करून बदनाम करणे हे त्यांचे मोठे शस्त्र आहे. मला सांगितलं जातं तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आहात तर मग मी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत त्यांच्या बाजूने मी पोष्ट लीहली आहे. ही राज्य सरकारच्या विरोधात पोस्ट आहे. कोणताही सरकार असलं तरी त्यांच्या विरोधात पोस्ट करणार तो माझा हक्क असल्याचे किरण माने यांनी म्हटले आहे.