Take a fresh look at your lifestyle.

काय आहे ट्रेंडिंग हॅशटॅग ‘बॅन लिपस्टिक’मागील सत्य?; तेजस्विनीनंतर आता प्राजक्ता माळीच्या व्हिडीओची चर्चा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अगदी काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक नवा हॅशटॅग चांगलाच चर्चेत आल्याचे दिसत आहे. हा हॅशटॅग आहे #BanLipstic. या हॅशटॅगने आता एवढा जोर धरला आहे कि, अनेक मुलींना हा हॅशटॅग वापरून पोस्ट केल्याचे दिसत आहे. अलीकडेच अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री सोनाली खरेने बॅन लिपस्टिक म्हणतं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर आता तिच्या पाठोपाठ अभिनेत्री प्राजक्ता माळीनेदेखील असाच संदर्भ असणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे आता प्राजक्ता मळीचा व्हिडिओसुद्धा चांगलाच चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे यांनी बॅन लिपस्टिक असा व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी त्यांनी व्हिडिओमध्ये ओठांवर लावलेली लिपस्टिक पुसून टाकत मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही. बॅन लिपस्टिक असा एक संदेश जारी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

यावेळी मराठी दिग्दर्शक संजय जाधव यांनी तेजस्विनीच्या पोस्टवर कमेंटमध्ये ‘क्या हुआ भाई?’ असा सवालही केला होता. मात्र याचे उत्तर काही मिळाले नाही. त्यावेळी काही यूजर्सने हे एखाद्या चित्रपटाचं प्रमोशन असेल असा अंदाज वर्तवला आहे. तर काहीच करायचं म्हणून ट्रोल केलं आहे.

आता चर्चेत असलेला प्राजक्ताचा व्हिडीओसुद्धा याच विषयाशी संबंधित असल्यामुळे मात्र आता सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता माळी ओठांना लावलेली लिपस्टिक पुसून बॅन लिपस्टिक असे म्हणताना दिसत आहे. प्राजक्ताने या व्हिडीओला कॅप्शन देत लिहीले आहे की, मला लिपस्टिकचा रंग नको… मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही. बॅन लिपस्टिक! यासह तिने बॅन लिपस्टीक हा ट्रेंडिंग हॅशटॅग दिला आहे. आता या व्हिडिओ मागचे नेमके सत्य काय? हा त्यांच्या आगामी चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ आहे का? किंवा मग एखादा पब्लिसिटी स्टंट? का कोणत्या मोहिमेचा प्रारंभ? या खेळीवरचा पडदा लवकरच उघडेल अशी आशा आहे.