Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

31 डिसेंबरच्या रात्री असं काय घडलंय..?; ‘वाळवी’च्या ग्रुपचं व्हॉट्सअप चॅट व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 2, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vaalvi
0
SHARES
1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नवीन वर्षाची हटके सुरुवात करणारा ‘वाळवी’ हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुबोध भावे, अनिता दाते, स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे अशी तगडी स्टारकास्ट आहे. गेल्या वर्षाला निरोप देताना ३१ डिसेंबर एकदम जंगी सेलिब्रेट केला गेला. ज्याने त्याने आपापल्या परीने हा दिवस साजरा करून सरत्या वर्षाला निरोप देत आगामी वर्षाचे स्वागत केले. या दरम्यान ‘वाळवी’ टीमचं व्हॉट्सअप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यामध्ये एक गूढ दडलंय. कसलं..? ३१ डिसेंबरचं.

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

अभिनेता सुबोध भावेने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट असून यात ‘वाळवी’च्या ग्रुपचे व्हॉट्सअप चॅट दिसते आहे. यामध्ये वाळवी, अंशुमन, देविका, अनिकेत आधीपासून ऍड आहेत आणि नंतर वाळवीने अवनीला ऍड केले. आधी सगळे एकमेकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत होते. पण अवनीचा मॅसेज पडताच बाकीचे सगळे लेफ्ट झाले. पण असं का..? ३१ डिसेंबरच्या रात्री असं काय घडलंय..? हा प्रश्न कुणालाही पडेलच ना. पण या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळणार नाही. यासाठी काही दिवस कळ काढावी लागणार आहे.

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

सुबोधने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘३१ डिसेंबरचा तुमचा काय प्लॅन..? या चौघांचा प्लॅन तर साफ फिसकटलाय.. बघूया आता पुढे काय होतंय…’ हे कॅप्शन आणि ग्रुप चॅट पाहून प्रेक्षकांनाही नक्कीच ३१ डिसेंबरच्या रात्री काय घडलं..? याची उत्सुकता निर्माण झाली असेल यात काही शंका नाही. तर ‘वाळवी’ हा चित्रपट येत्या १३ जानेवारीला सगळी उत्तरे घेऊन प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी केले असून गेल्या काही दिवसांपासून ‘वाळवी’ सिनेमाच्या प्रोमोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मुख्य म्हणजे यातील कोणत्याही प्रोमोतून चित्रपटात काय आहे याचा थांगपत्ता लागत नाही हीच याची खासियत आहे. शेवटी ‘वाळवी’चं ती.. सांगून थोडीच लागणार आहे.

Tags: Anita DateInstagram PostShivani Survesubodh bhaveswapnil joshiUpcoming Marathi MovieVaalviViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group