Take a fresh look at your lifestyle.

आणि दीपिकाला झाले अश्रू अनावर…

0

दीपिका पदुकोणसध्या ‘छपाक’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सिनेमाचा ट्रेलर येताच सगळ्यांच्या नजरा दीपिकावर खिळल्या. उत्तम कथानक आणि उत्कृष्ठ अभिनयाचा सुंदर मेळ या सिनेमात अनुभवता येणार आहे. 10 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘छपाक’ सिनेमाकडे साऱ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत.

नुकतीच दीपिका डान्स प्लस च्या लोकप्रिय रिऍलिटी डान्स शोमध्ये गेली होती. त्या शोमध्ये लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दीपिका अतिशय सुंदर दिसत होती. यावेळी दीपिकाला स्पेशल डान्स परफॉर्मन्स डेडीकेट करण्यात आला. यामध्ये तिची लोकप्रिय गाणी ‘दिवानी मस्तानी’ आणि ‘घुमर’ यावर स्पेशल परफॉर्मन्स करण्यात आला.

तिच्यासाठी सादर करण्यात आलेल्या या खास डान्स परफॉर्मन्सने दीपिका आपले अश्रू रोखू शकली नाही. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत दीपिका डान्स परफॉर्मन्स बघून भावूक झाल्याच दिसत आहे. दोन्ही हाताने चेहऱ्यावर हात ठेवून दीपिका रडू लागली. तिला स्वतःच्या भावना रोखता आल्या नाहीत. 

थोड्या वेळाने शांत झाल्यावर दीपिकाने सगळ्या परफॉर्मसचे आभार मानले. ‘मी आतापर्यंत अनेक कार्यक्रमात गेले आहे. पण आज मी जे अनुभवलं आहे ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी फक्त मनापासून इतकंच म्हणू शकते.

ऍसिड पीडित लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ सिनेमा 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मेघना गुलजार यांच दिग्दर्शन असून दीपिकाने या सिनेमात लक्ष्मीची भूमिका साकारली आहे.

व्हिडीओ पाण्यासाठी क्लिक करा –

Leave a Reply

%d bloggers like this: