Take a fresh look at your lifestyle.

जेव्हा सलमान खान सनी लिओनीला साडी नेसायला शिकवतो…

0

चंदेरी दुनिया । बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘दबंग ३’ सिनेमामुळेच नाही तर बिग बॉस या त्याच्या रिअॅलिटी शोमुळेही चर्चेत आहे. तर बिग बॉसची माजी स्पर्धक सनी लिओनीही सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या फोटो आणि व्हिडिओमुळे ती चर्चेत असते. आता सोशल मीडियावर सलमान आणि सनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सलमानने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये बस्तान बसवण्यासाठी मदत केली. एवढंच नाही अनेकांचं बुडत्या करिअरलाही त्याने हात दिला. पण सनी लिओनी ही एक अशी अभिनेत्री आहे जिची सलमानने चक्क साडी नेसण्यात मदत केली. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

जानेवारी २०१४ मध्ये स्टार गिल्ड पुरस्कारांच्यावेळी सलमानने सनीला साडी नेसायला शिकवलं होतं. यानंतर सनी म्हणाली होती की, ‘माझं स्वप्न पूर्ण होण्यासारखंच होतं.’ सनी लिओनीने बिग बॉस ५ मध्ये एक स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. यावेळचा सनीचा पोल डान्स फार प्रसिद्ध झाला होता.
Leave a Reply

%d bloggers like this: