Take a fresh look at your lifestyle.

NCB अधिकाऱ्याच्या भूमिकेची ऑफर कधी मिळणार?; अक्षय कुमारची उकंठता शिगेला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच गाजलेले मुंबई कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन खान चांगलाच पिसला गेला. तर या प्रकरणाची चौकशी सूत्र सांभाळणारे NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे देखील या प्रकरणात चांगलेच उलटे पालटे केले गेले लागेल. या प्रकरणामुळे आर्यन खान, मुंबई क्रुझ, ड्रग्ज आणि एनसीबी व एनसीबीचे अधिकारी चांगलेच चर्चेत दिसत आहेत. त्यातच, समीर वानखेडे हे मंत्री नवाब मलिक यांच्या आरोप सत्रांमुळे देशभर चर्चेत असलेले अधिकारी आहेत. यामुळे अनेकांनी समीर वानखेडे यांना समर्थन देताना सिंघम अधिकारी असेदेखील म्हटले आहे. मुख्य बाब म्हणजे अनेकांनी हे ड्रग्ज प्रकरण आणि समीर वानखेडे यांच्यावर चित्रपट बनविण्याचे सुचविले असता बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारने NCB अधिकाऱ्याची भूमिका साकारण्यासाठी कधी ऑफर मिळते अशी उत्कंठता व्यक्त केली आहे.

नुकताच अक्षय कुमारचा रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर सूर्यवंशी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसत आहे. हा चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनि बऱ्याच दिवसांनी थिटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचा आस्वाद घेतला. परिणामी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. सांगायचे म्हणजे अगदी ५ दिवसांत ‘सूर्यवंशी’ने १०० कोटींचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे, एकीकडे बॉलिवूडचा खिलाडी अर्थातच अक्षय कुमार चांगलाच खुश आहे. त्यामुळे माध्यमांशी बोलताना त्याने आपली दिवाळी जोरदार गेल्याचे म्हटले आहे.

याचसोबत भूमिकेविषयी बोलताना त्याने आपले स्पष्ट मत आणि आवड व्यक्त केली आहे. सूर्यवंशी चित्रपटाला मिळालेल्या यशाने अक्षय अत्यंत समाधानी आहे. त्यासंदर्भात बोलताना अक्षयने कोरोना काळानंतरचे बदल, कोरोना काळ आणि बदलेलं डिजिटल माध्यम यांबाबत आपले स्वतःचे असे सविस्तर मत मांडले आहे. तसेच, पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेनंतर आता एनसीबी अधिकाऱ्याची भूमिका साकारणार का? असा प्रश्न अक्षयला विचारण्यात आला असता एकही क्षणाची वाट न पाहता त्यावर मला तशी ऑफर आल्यास एनसीबी अधिकाऱ्याची भूमिका साकायरला निश्चितच आवडेल. मी तर वाट पाहतोय, असेही अक्षयने म्हटले आहे.