हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल तर बॉलिवूडचे सेलिब्रिटी जितके चर्चेत नसतात त्याहून जास्त त्यांची मुलं चर्चेत असतात. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, सुहाना खान तर सैफ अली खानची मुलं सारा अली खान, तैमूर याशिवाय ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या बच्चन. असे अनेक स्टार किड्स आता स्वतःच सेलिब्रिटी होताना दिसत आहेत. यामध्ये बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची लेक निसा देवगणच्याही नावाचा समावेश आहे. विविध ठिकाणी मित्र मैत्रिणींसोबत पार्टी करताना अनेकदा निसा स्पॉट झाली आहे. याहीवेळी ती पार्टीसाठी येतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती पार्टीआर्धीच धडपडताना दिसली आणि त्यामुळे नेटकरी विविध कमेंट करत तिची खिल्ली उडवत आहेत.
रविवार म्हणजे विकेंड वार आणि त्यामुळे निसा पुन्हा एकदा तिच्या मित्र- मैत्रिणींसोबत पार्टीसाठी आली होती. तेव्हाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसतंय कि, निसा अतिशय सिम्पल ड्रेसिंगमध्ये आहे. कारचा दरवाजा उघडून ती बाहेर पडताना दिसतेय. मात्र गाडीतून उतरताना ती अचानक उडी मारते आणि धडपडते. यावेळी समोर असलेल्या सुरक्षारक्षकाला तिचा हलका धक्का लागतो. मात्र ती लगेच स्वत:ला सांभाळते आणि पडण्यापासून वाचते. या दरम्यान, तिच्या चेहऱ्यावर पचका झाल्यानंतर किंवा बचावानंतर चेहऱ्यावर येणारे हास्य दिसते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले आहे कि, ‘निसाने मुद्दाम सुरक्षारक्षकाला धक्का दिला’. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘नक्कीच या मुलीमध्ये काहीतरी गडबड आहे’. तर आणखी एका नेटकऱ्याने विचारले आहे कि, ‘ही सतत नशेतच असते का..?’ याशिवाय अन्य एकाने म्हटले आहे कि, ‘निसा सतत कुठे ना कुठे धडपडताना का दिसते.. ?’
Discussion about this post