हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. सुकून या नावाने तो अनेकदा नेटकऱ्यांच्या मनाचा ठाव घेईल असे शब्द लिहीत असतो. यावेळी त्याने आपल्या बेस्ट फ्रेंड सोबतचा एक फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा फोटो आहे कुशल आणि त्याच्या सोबत श्रेया बुगडेचा. कुशल आणि श्रेया ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कॉमिक शोचा अविभाज्य भाग आहेत. ते नेहमीच आपल्या अतरंगी शैलीने आणि परफेक्ट कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसतात.
अभिनेता कुशल बद्रिकेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर श्रेया बुगडेसोबतचा हा फोटो शेअर करताना एक अतिशय सुंदर असं कॅप्शन लिहिलं आहे. या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे कि, ‘कधी कधी आयुष्य ना, समुद्रात हरवलेल्या गलबतासारखं होऊन जातं, “दिशाहीन” नुसतं लाटांवर हेलकांडत तरंगत असल्यासारखं, पण एकदा का शिडांमधला “वारा” आणि दिशांमधला “तारा” गवसला ना की परतण्याचं बंदर गाठायला वेळ लागत नाही :- सुकून’
कुशल आणि श्रेयाचा हा फोटो अतिशय सुंदर असून यावर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने या फोटोवर कमेंट करताना लिहिलंय कि, ‘खरं आहे भावा कुश्या.. गलबत आणि आपलं मन सारखंच असतं. दिशाहीन आणि धावत असतं.. पण एकदा ध्येय ठरवलं कि अंतर गाठायला वेळ लागत नाही…: जुनून’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘गोड कँडिड आणि सर्वात गोंडस माणसं… एक माणूस भलताच Endearing (प्रिय) दिसतोय या फोटोत’. याशिवाय आणखी एका युजरने लिहिलंय, ‘बेस्टीज.. खूप मस्त कॅप्शन’.
Discussion about this post