हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी चित्रपटसृष्टी एकामागे एक अशा दर्जेदार कलाकृती देत आहे कि प्रेक्षकांना भरून पावल्याचा आनंद मिळतोय. यामध्ये प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी आणि प्रसाद ओक अभिनित धर्मवीर चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांनीच नव्हे तर समीक्षकांनीही भरभरून प्रेम दिल आहे.
प्रेक्षकांनी यातील ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट अगदी डोक्यावर उचलून घेतला आहे. इतकेच नव्हे तर हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये फक्त एकच प्रेक्षक दिसून आला. हा प्रेक्षक नक्की होता तरी कोण..? याबाबत माहिती देणारी एक पोस्ट अभिनेता प्रसाद ओक याने केली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला आहे.
त्याचं झालं असं की, प्रसाद ओक याचे चाहते म्हणजेच आचार्य श्री धर्मराज गुरुजी यांनी ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट पाहण्याचे ठरविले. मुख्य म्हणजे यासाठी त्यांनी संपूर्ण चित्रपटगृहच बूक केलं होत. त्यांनी स्वतः एकट्याने बसून या संपूर्ण चित्रपट पाहिला आणि याचदरम्यानचा आचार्य श्री धर्मराज गुरुजी यांचा व्हिडीओ अभिनेता प्रसाद ओक याने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धर्मवीर पाहायला गेलेले धर्मराज गुरुजी दिसत आहेत.
हि व्हिडीओ शेअर करताना अभिनेता प्रसाद ओक याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, “धर्मवीर” चा show पहायला सिनेमागृहात “फक्त एकच माणूस”????? मराठी कलाकाराच्या बाबतीत किंवा मराठी सिनेमासृष्टीत. हे कदाचित पहिल्यांदाच घडत असावं…!!!याचं कारण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच कळेल…!!!आचार्य श्री धर्मराज गुरुजी…तुमचे आभार कसे मानू.. तेच कळत नाहीये गुरुजी… असंच प्रेम…असाच आशीर्वाद कायम असुद्या हीच नम्र विनंती. १३ मे २०२२ रोजी प्रदर्शित झालेला धर्मवीर आजही तुफान चालतोय. जेव्हढी पैश्याची कमाई या चित्रपटाने केली त्याहून अधिक प्रेमाची कमाई केली आहे.
Discussion about this post