हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चावटपणा, अतरंगी गाणी आणि फुल्ल ऑन धमाल कथानक असणारे ‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ हे दोन्ही चित्रपट चांगलेच गाजले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. यानंतर आता पुन्हा एकदा तीच मजा तीच धमाल घेऊन हे बॉईज परत येत आहेत.
येत्या १६ सप्टेंबर २०२२ रोजी धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर हे ३ बॉईज ‘बॉईज ३’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. पण या पोस्टरमध्ये दिसणारी ती अभिनेत्री कोण आहे..? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. दरम्यान अभिनेत्री विदुला चौगुलेच्या नावाची चर्चा सुरु आहे.
या चित्रपटात पुन्हा एकदा बॉईजच्या आयुष्यात एका मुलीची एंट्री होणार आहे. पण हि आहे तरी कोण…? कारण मोशन पोस्टरमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीचा चेहरा दिसत नाहीये आणि त्यामुळे सगळेच कन्फ्युज होत आहेत. गेल्या दोन्ही भागांमध्ये कबीरच्या आयुष्यात एक मुलगी आली आणि यांच्या आयुष्याचा पंचनामा झाला. यामुळे आता परत आगामी चित्रपटात येणारी ‘ती’ या तिघांच्या आयुष्यात काय गडबड घेऊन येणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे. अजूनतरी हि अभिनेत्री कोण आहे हे अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. मात्र जीव झाला येडापीसा या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेतून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री विदुला चौघुले या पोस्टरमध्ये असावी अशी चर्चा सुरु आहे.
अभिनेत्री विदुला चौघुले हि कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने सिद्धी हे पात्र साकारले होते. वयाने लहान असणाऱ्या या अभिनेत्रीने अनेकांच्या दांड्या उडवल्या. यानंतर आपल्या शैक्षणिक क्षेत्राकडे लक्ष देत तिने काही काळ विश्रांती घेतली.
यानंतर आता ती पुन्हा एकदा थेट चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येते का काय..? असे वाटत आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या सहयोगाने अवधूत गुप्ते प्रस्तुत चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे व संजय छाब्रिया ‘बॉईज ३’चे निर्माते आहेत.