हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सीसाठी जय आणि विशाल यांच्यामध्ये लढत सुरु आहे. अगदी पहिल्याच दिवसापासून या दोघांमधली समीकरणं रोज बदलताना दिसली. पण घरातील इतर प्रत्येक सदस्यांसोबत जय असो किंवा विशाल यांचे नाते काही वेगळेच आहे. कुणाशी प्रेमाचे, कुणाशी मैत्रीचे तर कुणाशी सलगीचे नाते या स्पर्धकांनी बनविले असताना आता कॅप्टन्सीच्या कार्यात हीच नाती दावावर लागली आहेत. असे असताना कॅप्टन्सीसाठी दोघे समोर आल्यानंतर अंतिम सुटकेचा धागा स्नेहा वाघच्या हाती आल्याचे दिसत आहे. पण अद्याप कोण कप्तान झाले आहे याचे उत्तर अनुत्तरित आहे.
बिग बॉसच्या घरात कधी कोणतं नातं कोणत्या वळणावर अचानक पलटी मारून बदलेलं याचा काहीच नेम नाही. यामुळे शो सुरु झाल्यानंतर एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण असलेल्या अनेक नात्यात आता फूट पडली आहे. त्यामुळे या घरात दररोज नाती बदलतांना दिसतात. कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टापेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत विशाल आणि स्नेहा घरात रंगत असलेल्या कॅप्टन्सी टास्कविषयी बोलताण विशाल स्नेहासमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त करताना दिसला. परंतु, हे केवळ टास्क पुरतं मर्यादित आहे की खरंच त्याला मनापासून वाटतंय हे मात्र, त्याच त्यालाच माहित. कारण याच बोलण्यास स्नेहाने आपला निर्णय आपले समर्थन कुणाला आहे हे सांगायचे होते.
स्नेहाचं मत मिळावं यासाठी विशालने शक्य तितके शर्थीचे प्रयत्न केले असतील यात काहीच वाद नाही. पण शेवटी स्नेहाचे मत काय आहे हेच कॅप्टन्सीच्या कार्याचे वळण निश्चित करणार आहे. सध्या घरात विशाल आणि जय यांच्यात कॅप्टन्सी रंगत असताना उत्कर्ष, मीरा, गायत्री आणि दादूस यांनी जयला समर्थन दिलं. तर मीनल, विकास, सोनाली आणि नीथा हे विशालला पाठिंबा देताना दिसले आता उरली स्नेहा. यामुळे विजयाचा दोर स्नेहाच्या हाती बिगबॉसने सोपवला आणि कार्याला वेगळेच वळण मिळाले. यामुळे स्नेहाचं मत मिळवणं जय आणि विशालसाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तिचं मन वळवण्यासाठी व तिचं मत मिळवण्यासाठी दोघंही प्रयत्न करतात. दरम्यान स्नेहा प्रोमोमध्ये असेही बोलताना दिसते कि, विशाल तुम्ही मन जिंकले…. माझे समर्थन.. , हे जाणून घेणयासाठी आजचा भाग पाहावा लागेल.