हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बाहुबली हा असा सिनेमा आहे जो बॉलिवूड, टॉलिवूडच्या इतिहासातील भव्य सिनेमा ठरला आहे. या चित्रपटातील सर्व पात्रे चांगलीच लक्षात राहिली आहे. सध्या बाहुबलीच्या भल्लालदेवच काहीतरी बिनसलं आहे असं वाटतंय. कारण अभिनेता राणा दग्गुबाती याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवरील सगळ्या पोस्ट डिलिट केल्या आहेत. होय. राणा दग्गुबातीचं तर इंस्टाग्राम अकाऊंट दिसतचं नाही आहे. कारण त्याने सगळे रील्स आणि फोटो डिलिट केले आहेत. पण का….? असा प्रश्न पडला असेल तर याच उत्तर अद्याप त्यानं काही दिलेलं नाही.

राणा दग्गुबातीनं हे असं का केलं..? याचं उत्तर जरी नसलं तरीही काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या पत्नीसोबत लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं होत. ज्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हा तर सगळं व्यवस्थित आहे असंच वाटत होत. तर मग राणाने पोस्ट डिलीट का केल्या..? त्याच काय आहे, ५ ऑगस्ट २०२२ रोजी अभिनेता राणा दग्गुबाती याने आपल्या ट्वीटरवर घोषणा केली होती की सोशल मीडियापासून तो सध्या लांब राहणार आहे. यात त्याने लिहिलं होतं कि, ‘काम सुरू आहे. पण सध्या सोशल मीडियापासून लांब जात आहे. तुम्हाला सिनेमात मात्र नक्कीच दिसेन. सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू दे.’
अभिनेता राणा दग्गुबातीचे प्रचंड फॉलोवर्स आहेत. सध्या त्याच्या इंस्टाग्रामवर ४ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. पण आता त्याने इंस्टाग्राम हँडलच डिलीट केलं म्हटल्यावर काय बोलायचं. अभिनेता राणा दग्गुबाती याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो नुकताच ‘विरता पर्वम’ या चित्रपटात दिसला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपशेल तोंडावर पडला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त १२ करोड रुपयांची कमाई केली आहे.

Discussion about this post