Take a fresh look at your lifestyle.

किसी को जला के मज़लूमों की बद्दुआ क्यों लेना? अनु कपूर यांचे संतापजनक ट्विट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अन्नू कपूर हे नेहमीच त्यांच्या परखड स्वभावामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांनी ट्विटर वर एक ट्विट करीत देशातील सेलिब्रिटींवर टीका केली आहे. कोरोनामुळे देशात हाहाकार माजला आहे. सध्या लोकांना ऑक्सिजन, औषध, अगदी रूग्णालयात बेडदेखील मिळत नाही आहेत. अशात सेलिब्रिटी देश सोडून परगावी व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. इतकेच नव्हे तर व्हॅकेशनचे ग्लॅमरस, बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींचा यात समावेश आहे. या अशाच लोकांवर अन्नू कपूर अतिशय संतापले आहेत. यामुळे त्यांनी ट्विटरवर पोस्ट लिहून आपला राग व्यक्त केला आहे.

या ट्विटमध्ये अनु कपूर यांनी लिहिले आहे कि, ‘मी नम्रपणे सर्व क्षेत्रातील श्रीमंत व लोकप्रिय लोकांना विनंती करतो की, विदेशातील सुट्टीचे फोटो किमान अशा काळात पोस्ट करू नका. बहुतांश जग या महामारीची झळ सोसत आहे. किसी को जला के मजलूमों की बद्दुआ क्यों लेना?’, अशा संदर्भाचे ट्विट त्यांनी केले आहे. त्यांचे ट्विट वाचल्यानंतर अनेकांनी सकारात्मक समीक्षा दिल्या आहेत. अन्नू कपूर यांनी केलेल्या या ट्विटचे सध्या सर्व स्तरावर कौतुक होत आहे. सोबतच वाचकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या वक्तव्यासोबत सहमत असल्याचे म्हटले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच एक पोस्ट केली होती. ह्या पोस्टमध्ये त्यांनी कवितेच्या काही ओळी पोस्ट केल्या होत्या. ‘ये गलत है वो गलत है वो गलत बोला इसका मतलब तुम्हें बोध है गलत का ! तो सही की तलाश में जुट जाओ वरना तुम्हारा, किसी को गलत ठहराना, बिना सही बताए, सिवाय मक्कारी चालाकी उपद्रव के अलावा कुछ नहीं होगा दुनिया को कन्फ्युजन देने वालों की कमी नहीं दम है तो सोल्युशन दो,’ असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले होते.

अनु कपूर स्पष्टवक्ते असल्यामुळे ते नेहमीच परखड शब्दांत आपली भूमिका मांडताना दिसतात. त्यांचा चाहता वर्ग त्यांच्या याच अंदाजावर फिदा आहे. अन्नू कपूर लवकरच अमिताभ बच्चन व इमरान हाश्मीच्या ‘चेहरे’ या सिनेमात दिसणार आहेत.