Take a fresh look at your lifestyle.

परत कशाला आलात तिथेच राहायचं होत…व्हॅकेशनहून परतलेल्या सेलिब्रिटींवर युजर्सने केला संतप्त कमेंट्सचा भडीमार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर रोख आणण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अशा परिस्थितीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सुट्टीवर गेले आहेत. मालदीवला जाऊन ते सुट्टीचा आनंद घेत आहेत. इतकेच नव्हे तर तिथले फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यावरून सेलिब्रेटींना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. मात्र आता हे सेलिब्रेटी भारतात परतले आहेत. त्यांचे फोटो पाहताच युजरने त्यांच्यावर हल्ला बोल केला आहे. या सेलिब्रिटींना सोशल मीडियाद्वारे लोकांनी चांगलेच सुनावले आहे.

आम्ही आता यांचे चित्रपट पाहाणारच नाही, म्हणजे याना कळेल असे सोशल मीडियावरील कमेंटद्वारे लोक म्हणत आहेत. तसेच लॉकडाऊन हा केवळ गरिबांनाच असतो का असा प्रश्न देखील नेटिझन्स विचारत आहेत. यांनी परत येण्याची गरजच काय होती असे देखील लोक त्यांना सोशल मीडियाद्वारे विचारत आहेत. तसेच यांना प्राधान्य देण्याची काय गरज आहे? द्यायचं आहे तर खऱ्या हिरोंना द्या., थोडी तरी जबाबदारीची जाण ठेवा अश्या अनेक कमेंट्समधून लोक आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

रणबीर कपूर, आलिया भट, टायगर श्रॉफ, दिशा पटानी, अनन्या पांडे, सारा अली खान यांसारखे सेलिब्रेटी व्हेकशनवर गेले होते. त्यातील अनेकजण नुकतेच भारतात परतले आहेत. देशात कोरोनाव्हायरसमुळे बिघडत चाललेल्या परिस्थितीतते परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करीत होते. तसेच सोशल मीडियावर फोटोसुद्धा शेअर करत होते. या सेलिब्रिटींवर अभिनेता नवाझुद्दीन प्रचंड भडकला होता. स्पॉटबॉयशी संवाद साधताना त्याने सांगितले होते की, ‘लोकांना अन्न नाही आणि तुम्ही पैसे फेकून एन्जॉय करत आहात. थोडी तरी लाज बाळगा.’ तर अभिनेत्री श्रुती हसन आणि प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी देखील सेलिब्रिटींच्या व्हॅकेशन फोटो टाकण्याबाबत नाराजी व्यक्त केली होती.