Take a fresh look at your lifestyle.

एवढा ऍटिट्यूड कश्याचा?; अक्षय कुमारचा वायरल व्हिडीओ पाहून चाहते भडकले

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा चाहतावर्ग इतका मोठा आहे कि बस्स रे बस्स. तसं पाहाल तर मिस्टर खिलाडी अर्थात अक्षय कुमार बॉलिवूड जगतातील अत्यंत व्यग्र कलाकारांपैकी एक आहे. शिवाय त्याचे चाहतेही असंख्य आहेत. म्हणूनच अक्की दिसला कि सगळे त्याच्याभोवती गराडा घालताना दिसतात. याशिवाय खिलाडीसोबत सेल्फी घेण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच आतुर असतात. तसा अक्षय चाहत्यांना निराश करताना आजपर्यंत कधीच दिसला नाही. पण अलीकडे त्याचा एक असा व्हिडीओ वायरल झाला आहे कि तो पाहून चाहत्यांचा जणू भ्रमनिरास झाला आहे.

 

त्याच झालं असं कि, अक्षयला समोर पाहून त्याची एक चाहती इतकी वेडीपिशी झाली की, त्याच्या जवळ जाण्यापासून ती स्वत:ला रोखू शकली नाही आणि तेव्हाचाच हा व्हिडीओ पँराझींच्या हाती लागला आहे. हि घटना आहे मुंबई एअरपोर्टची. नुकताच अक्षय लंडनवरून मुंबईत परतला आहे. दरम्यान मुंबई एअरपोर्टवर त्याला पाहून त्याची एक चाहती समोर आली आणि मी तुझी खूप मोठी चाहती आहे, असे म्हणताना दिसली. पण या चाहतीला जवळ येताना पाहून अक्षय किंचीत मागे सरकला आणि नंतर तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आपल्या गाडीत बसून निघून गेला. यावेळी अक्षयची टीमदेखील हजर होती. अक्षयचे हे वागणे पाहून चाहते इक्तके नाराज झाले कि आपल्या लाडक्या अक्कीला ते ट्रोल करताना दिसले.

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि अगदी क्षणार्धात हा व्हिडीओ वायरल झाला. एअरपोर्टवरचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. खिलाडीचा अ‍ॅटिट्यूड पाहून अनेकांना चीड आली आणि राग अनावर झाला. अशांनी या व्हिडीओवर काहीशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि म्हटले आहे कि, ‘इतका अ‍ॅटिट्यूड कशाचा?’. तर, फालतू अ‍ॅटिट्यूड, असेही एका युजरने लिहिले आहे. आधी तर हा असा वागायचा नाही, अशी प्रतिक्रिया देत एका युजरने नाराजी व्यक्त केली. मी पहिल्यांदा अक्षयला असं वागताना पाहिलं. खूप दु:ख होतंय, असे म्हणत एका युजरने आपली खंत व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.