Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कारणामुळे वरून धवन संतापला…

0

चंदेरी दुनिया । बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा ‘कूली नंबर १’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. पण चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अनेक अडथळे येत असल्याचे दिसत आहे. नुकताच वरुण धवनच्या विश्वासू गाडी चालकाने चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे.

गेल्या आठवड्यात ‘कूली नंबर १’ चित्रपटाचे चित्रीकरण एनडी स्टूडीयो, कर्जत येथे सुरु असताना एक अनपेक्षित घटना घडली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना अचानक मुलगी चालत वरुण धवनकडे येते आणि त्याच्या गाडी चालकाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे सांगते. ते ऐकून वरुणला धक्काच बसतो. वरुणने लवकरच या विरुद्ध पाऊल उचलणार असल्याचे अश्वासन त्या मुलीला दिले आहे.

वरुणच्या गाडी चालकाचे नाव मनोज असे आहे. तो गेल्या कित्येक वर्षांपासून वरुणचा गाडी चालक म्हणून काम करत आहे. पण त्याच्या गैरवर्तणुकीमुळे वरुणने त्याला तडकाफडकी कामावरुन काढून टाकले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: