Take a fresh look at your lifestyle.

कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी पत्नीकडून अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात तक्रार दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्या विरुद्ध त्याची पत्नी स्नेहा हिने मानसिक, शारीरीक छळ, मारहाण आणि कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. यानुसार, पोलिसांनी ४९८अ, ३२३, ५०४, ५०६ कलमाखाली अनिकेत याच्यासह त्याच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मुंबईतील दहिसर येथील विश्वासराव रेसिडेन्सी येथे १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडत असल्याचे पीडितेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव याची पत्नी स्रेहा अनिकेत विश्वासराव (वय २९, रा. कोथरुड) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत स्नेहा यांनी म्हटले आहे कि, बाहेरील अनैतिक संबंध तसेच करियरमध्ये आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भितीने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. याशिवाय हाताने मारहाण करुन लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन वारंवार अतोनात मानसिक तसेच शारीरिक छळ केला. या सर्व प्रकारात सासु सासरे यांनी होणाऱ्या अत्याचाराला न रोखता दुजोरा दिला आहे.

अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि पत्नी स्रेहा चव्हाण यांचा २०१८ साली मध्ये विवाह झाला आहे. स्रेहा चव्हाण यादेखील एक अभिनेत्री असून त्यांनी काही मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. अभिनेत्री स्रेहा चव्हाणची आई राधिका चव्हाण या देखील मराठी मनोरंजन सृष्टीतील मालिका अभिनेत्री आहेत.

माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून स्रेहा व अनिकेत यांच्यात वारंवार लहान सहान गोष्टींवरून देखील मोठे वाद होत होते. परिणामी या सर्व गोष्टींना कंटाळून आणि जीवाला घाबरून फेब्रुवारी २०२१ मध्ये स्नेहा या त्यांच्या माहेरी पुण्यात परत आल्या.

त्यानंतर आता त्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद नोंदवली असून पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. लवकरच याविषयी पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल अशी माहिती आहे.