Take a fresh look at your lifestyle.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’; दयानंतर आता जेठालाल सोडणार मालिका?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सब टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चा चाहता वर्ग अतिशय मोठा आहे. याचे कारण म्हणजे या मालिकेतील शिकवण देण्याची पद्धत आणि कलाकारांनी जीव ओतून केलेला अभिनय. यामुळे हि मालिका गेल्या कितीतरी वर्षांपासून लोकप्रियतेच्या उच्चांकावर आहे. मालिकेतील जेठालाल आणि दयाबेनचे पात्र साकारणारे कलाकार दिलीप जोशी व दिशा वकानी यांचे पात्र इतके लोकप्रिय झाले कि बस्स. हि मालिका त्यांच्या कारकिर्दीतील एक टर्निंग पॉईंट ठरला. यानंतर दिशा वकानी यांनी वैयक्तिक कारणामुळे मालिका सोडली आणि आता दिलीप जोशी देखील मालक सोडणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत त्यांनी स्वतःच प्रतिक्रिया दिली आहे.

जेठालाल अर्थात अभिनेता दिलीप जोशी यांनी म्हटलं की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका खूप सुंदर प्रकारे सुरू आहे. असं असताना मी मालिका का सोडणार? तसेच या मालिकेने मला बरंच काही दिलं आहे. जेठालाल या भूमिकेमुळे प्रेक्षक माझ्यावर खूप प्रेम करतात. हे प्रेम मला गमवायचं नाही.’ महत्वाचं म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका मिळण्यापूर्वी एक वर्ष माझ्याकडे काहीच काम नव्हतं. मी असाच फिरत होतो. मी ज्या मालिकेत काम करत होतो ती मालिका बंद झाली होती. कोणतंही काम नसताना, पैसे नसताना तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने मला आधार दिला. हळू हळू ही मालिका आणि जेठालाल हे पात्र प्रेक्षकांना आवडले आणि आता मला हे प्रेम कायमस्वरूपी उराशी जपून ठेवायचं आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हि मालिका सब टीव्ही या हिंदी वाहिनीवर २००८ साली सुरु झाली. यानंतर आज २०२१ संपत आले आहे. मात्र मालिकेची लोकप्रियता, प्रसिद्धी आणि कलाकारांवरील प्रेक्षकांचे प्रेम अद्याप कमी झालेले नाही. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका जेठालाल यांच्या पात्राशिवाय अपुरीच वाटते. त्यामुळे दिलीप जोशी जेठालाल पात्राचा निरोप घेणार अशी चर्चा रंगतच गॉसिप सुरु झाले. याआधी मालिकेतील जेठालालची पत्नी दयाबेन हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानी शोचा निरोप घेणार अशी चर्चा रंगली आहे. त्यानंतर जेठालाल मालिका सोडणार म्हटल्यावर दिलीप जोशी यांनी लगेच प्रतिक्रिया देऊन गॉसिप्स थांबवले.