Take a fresh look at your lifestyle.

मन उडू उडू झालं; दिपूच्या अपघाताचं रहस्य इंद्राला समजणार..?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवर प्रसारित होणारी मन उडू उडू झालं हि मालिका सध्या वेगळ्याच वळणावर आहे. मालिकेत सानिका गर्भारपणाचं खोत नाटक करत असल्याचे दिपूसमोर येते. यानंतर दिपू सानिकाच्या नाटकांना वैतागून घरी सत्य सांगते आणि सानिका भांडून तावातावाने घराबाहेर पडते. घरच्यांना दुःख झाल्याचे पाहून दिपू तिला समजावण्यासाठी तिच्या घरी जाते पण सानिकाच्या तोरा आणि हट्टीपणा दिपूच्याच अंगाशी येतो. दिपूला घराबाहेर काढताना सानिका तिला ढकलते आणि दिपूचा अपघात होतो. यानंतर इंद्रा तिला हॉस्पिटलमध्ये तर नेतो पण तिचा अपघात कसा झाला हे त्याला कळत नाही.

यानंतर मालिकेचा आता नवा प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यामध्ये इंद्राचा मित्र दत्तू ज्या टेम्पोने दिपूचा अपघात झाला त्याला घेऊन येतो. त्याला बोलतं करतो. पण त्याच्या बोलण्यातून तो दिपूच्या अपघाताला जबाबदार नाही असे इंद्राला समजते. यानंतर तो त्याला सोडून देतो. पण मग दिपू अचानक टेम्पोसमोर कशी आली असा प्रश्न तसाच कायम राहतो. यानंतर आणखी एका प्रोमोमध्ये दिपू जखमी आणि गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये असल्याचे दिसत आहे. सानिका दिपूला तिचा अपघात कसा झाला ते सांगायचे नाही असे बजावते.

यानंतर सानिका बाहेर पडताना इंद्रा तिला थांबवतो आणि अपघात कसा झाला असे विचारतो. यावर सानिका सांगते कि, दिपू आली माझ्याशी भांड भांड भांडली आणि मग तडकाफडकी घरातून बाहेर पडली. अशातच ती गाडीसमोर आली आणि तिचा अपघात झाला. हे ऐकूनही इंद्राच्या मनात दिपू अचानक गाडीसमोर आलीच कशी हा प्रश्न कायम राहतो.

पण तो तर्क लावतो कि दिपू अचानक गाडीसमोर तेव्हाच येऊ शकते जेव्हा तिला कुणीतरी धक्का दिला असेल. आता इंद्राचा तर्क खरे सत्य आहे हे कळायला फार वेळ लागणार नाही आणि प्रेक्षकांचीही इच्छा आहे कि इंद्राला दिपूच्या अपघातांमागील खरे सत्य समजायला हवे. आता पुढे काय होणार..? हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा मन उडू उडू झालं.