Take a fresh look at your lifestyle.

लेकाच्या ड्रग्ज प्रकरणानंतर शाहरुख खानसाठी मांजरेकरांचा सल्ला मोलाचा ठरणार का?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजेरकर त्यांच्या बेधडक व्यक्तिमत्वामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे सतत चर्चेत असतात. मराठी सिनेसृष्टी असो किंवा बॉलिवूड इंडस्ट्री नाहीतर दाक्षिणात्य इंडस्ट्री. महेश मांजरेकरांना प्रत्येक सिनेसृष्टीत एक वेगळे स्थान आणि एक वेगळा सन्मान आहे. यामुळे त्यांनी कोणत्याही कलाकाराबद्दल काहीही भाष्य करणे हा चर्चेचा विषय होण्यास वेळ लागत नाही. नुकताच मुलाच्या ड्रग्स प्रकरणामुळे अभिनेता शाहरूख खान जितका चर्चेत तितकाच चिंतेत असल्याचे दिसताना महेश मांजरेकरांनी त्याला मोलाचा सल्ला देऊ केला आहे. महेश मांजरेकर म्हणतात कि, बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आपल्या गुणांना वाव देत नाही. तो आता काही नवीन करताना दिसत नाही. त्याला स्वतःला आपल्या कोशातून बाहेर पडावं लागेल.

महेश मांजरेकर म्हणाले की, ‘शाहरूखकडे त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या एका उत्तम कलाकाराकडे असायला हव्यात. मात्र तो स्वतःच्याच कोशात अडकला आहे. त्याला काही तरी वेगळं करण्याची गरज आहे.’ एक असा अभिनेता ज्याने आपल्या प्रतिभेला न्याय दिला नाही, तो शाहरुख खान आहे. समस्या अशी आहे की, त्याला त्याच्या कोशातून बाहेर यायच नाही. त्याला फक्त माझे हे चित्र चालेल या विश्वासाने जगायचे आहे. मी एक प्रेमी मुलगा आहे. ‘माझा फक्त सिनेमा चालावा. मी एक लवरबॉय आहे. त्याला आपल्या या कोशातून बाहेर यावंच लागेल’.

 

पुढे, आजकाल रणवीर सिंग आणि रणबीर कपूर जी व्यक्तिरेखा साकारत आहेत, तीच भूमिका शाहरुख खानसुद्धा करत आहे. मग लोक शाहरुख खान का पाहतील? लोकांना या पात्रांमध्ये शाहरुख पाहायचा आहे का? आणि मुळात या व्यक्तिरेखा फक्त शाहरुखसाठी बनवण्यात आले आहेत असे त्याला म्हणायचे आहे का? म्हणूनच मला स्वतःला वाटते की शाहरुख खानने बनवलेल्या कोशातून स्वतःहून बाहेर पडावे, तरच तो काहीतरी चांगले करू शकेल. शेवटी तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, नुकताच महेश मांजरेकर दिग्दर्शित अंतिम हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे . या चित्रपटात सलमान खान आणि आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसत असून हा चित्रपट मराठी चित्रपट मुळशी पॅटर्नचा रिमेक आहे. याशिवाय महेश मांजरेकर ‘बिग बॉस मराठी सीजन ३ चे सूत्रसंचालन करताना दिसतात.

Leave A Reply

Your email address will not be published.