Take a fresh look at your lifestyle.

प्राजक्ता माळीचं यंदा कर्तव्य आहे? रोज शेअर करतेय साडीवरचे फोटो..

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि महाराष्ट्राची लाडकी अँकर प्राजक्ता माळीच्या हुस्नचे चर्चे तर नेहमीच असतात. कधी फोटोमुळे तर कधी व्हिडीओमुळे चर्चेत असणारी प्राजक्ता हि सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा अगदी गाजवताना दिसतेय. जितका सहज अभिनय तितकेच मोहक सौंदर्य आणि तितकेच लडिवाळ हास्य असणारी प्राजु सगळ्यांचीच फेव्हरेट आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणे जणू तिचा छंद आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे साडी परिधान केलेले फोटो कहर करताना दिसत आहेत. यानंतर आता कौतुक करणारे नेटकरी चक्क प्राजक्ताचं यंदा कर्तव्य आहे असे म्हणू लागले आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, डोळं नाही थार्‍याला…लव लव करी पातं…! या फोटोंमध्ये प्राजक्ताने अतिशय सुंदर अशी नॅचरल कलरची साडी परिधान केली आहे.

यामध्ये तीच सौंदर्य अतिशय खुलून दिसत आहे. नेहमीप्रमाणे प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे तर अनेकांनी तिच्या स्टाईलचे. पण या सगळ्या कमेंट्समधील एक कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

एका नेटकऱ्याने प्राजक्ताच्या या फोटोंवर कमेंट करताना लिहिले आहे कि, यंदा कर्तव्य आहे.. गर्ल ऑफ महाराष्ट्र. त्यामुळे आता सोशल मीडियावर प्राजक्ताच खरंच यंदा कर्तव्य आहे का काय..? अशा चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. तसे पाहता प्राजक्ता सोशल मीडियावर इतकी सक्रिय असते कि काही विचारायलाच नको. त्यात गेल्या काही दिवसापासून सलग साडीतील फोटो शेअर करून तिने चाहत्यांमध्ये स्वतःच क्रेझ कमी आणि कन्फ्युजन जास्त वाढवलं आहे. आता खर्च यंदा कर्तव्य आहे का… नाही? हे प्राजक्ताच सांगू शकेल. तूर्तास चालू चर्चांनी संपूर्ण सोशल मीडिया नुसता दणाणून सोडला आहे हे नक्की.