Take a fresh look at your lifestyle.

पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला ब्रिटिश नागरिकत्वाचा फायदा?; काय म्हणाले कायदे तज्ञ? जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. या प्रकरणात राज कुंद्राविरोधात भारतीय दंड विधान आणि माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. शिवाय पोलिसांनी त्याच्याविरोधात सक्षम पुरावे असल्याचे म्हटले आहे. तर या अश्या परिस्थितीत राजला ब्रिटिश नागरिकत्व असल्याचा फायदा होईल का नाही? तसेच ब्रिटिश नागरिक असल्याचा या केसवर काय परिणाम होईल? असे सर्व सामान्य प्रश्न नागरिकांना पडले आहेत.

भारतीय कायद्यानुसार ज्या कलमांतर्गत राज कुंद्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये दोषी आढळल्यास राज कुंद्राला साधारण ५ – ७ वर्षांपर्यंत कठोर कारावासाची शिक्षा होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात क्राईम ब्रांचने ४ फेब्रुवारी २०२१ रोजीच गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी भारतीय दंड विधान कलम २९२, २९३, ४२०, ३४ आणि आयटी कायदा कलम ६७, ६७अ आणि अन्य कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील कलम ४२० ,आयटी कायदा कलम ६७ अ हे अजामिनपात्र आहेत. यामध्ये दोषी करार सिद्ध झाल्यास ५-७ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

या दरम्यान राज कुंद्राला ब्रिटीश नागरिकत्वाचा फायदा होणार का? असे प्रश्न केले. त्यामुळे या प्रश्नाला उत्तर देत दिल्ली हायकोर्टाच्या बार असोसिएशनचे सचिव अभिजात बल म्हणाले, राज कुंद्रा हा ब्रिटनचा नागरिक असल्याचा त्याच्या जामीन अर्जावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

कारण तो भारतीय नागरिक नसल्याने फरार होण्याची शक्यता असल्याचा तर्क सरकारी पक्षाकडून देण्यात येऊ शकतो. त्यामुळे जर राज कुंद्रा कुठल्याही भारतीय नागरिकाप्रमाणे सिद्ध झाला तरच त्याच्यावर सर्व आरोप हे दंडविधानाप्रमाणे चालतील. मात्र हे सर्व तपासादरम्यान किती माहिती समोर आली आहे, तपासा दरम्यान किती पुरावे गोळा झाले आहेत या बाबींवर अवलंबून आहे. अशी माहिती अभिजात बल यांनी दिली आहे.