Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नायक नहीं… ‘खलनायक’; ‘हेरा फेरी 3’मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार व्हिलनची भूमिका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 27, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Hera Pheri 3
0
SHARES
674
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीने आतापर्यंत अनेक तुफान आणि कमालीच्या कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर केल्या आहेत. यातील अनेक कलाकृती आजही जिवंत आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘हेरा फेरी’ या चित्रपटाची सिरीज. या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, कॉमेडी किंग परेश रावल आणि अण्णा सुनील शेट्टी यांचं धमाल त्रिकुट आपल्याला पहायला मिळालं आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या सर्व सिरीज कमालीच्या हिट झाल्या आहेत. यानंतर आता हे ३ ठार वेडे कलाकार आपल्याला खदखदून हसवायला ‘हेरा फेरी ३’ घेऊन येत आहेत. ज्याच्या शूटिंगला सुरुवात झाली असून आता या चित्रपटातील खलनायक समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by TheWood (@thewood700)

काही महिन्यांपासून ‘हेरा फेरी’ या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक महिने या चित्रपटावर काम केल्यानंतर आता या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. मध्यंतरी या चित्रपटात अक्षय कुमार नसून त्याची जागा कार्तिक आर्यन घेणार अशाही बातम्यांना उधाण आलं होत. ह्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी दिसून आली. पण आता चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून शूटिंग सेटवरील काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये परेश रावल बाबुभाईच्या गेटअपमध्ये आणि अक्षय कुमार राजुच्या गेटअपमध्ये दिसत आहे. तर सुनील शेट्टी मात्र साध्याच कपड्यांमध्ये दिसत आहे. याशिवाय चालू चर्चांनुसार या चित्रपटात अभिनेता संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

इतकंच नव्हे तर बॉलिवूड हंगामाच्या रीपोर्टनुसार, या चित्रपटाचं नाव ‘हेरा फेरी ३’ नाहीये. तर ‘हेरा फेरी ४’ असे आहे आणि यामागील कारण या नव्या प्रोमोमध्ये दडल्याचं म्हटलं जात आहे. तसेच बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार असल्याची शक्यता या माध्यमाने वर्तवली आहे. कारण संजय दत्तने एक नवा चित्रपट स्वीकारला आहे ज्यात तो एका आंधळ्या आणि तितक्याच विचित्र खलनायकाची भूमिका साकारतो आहे.

View this post on Instagram

A post shared by OCD TIMES (@ocdtimes)

फिरोज नाडियाडवाला यांच्या मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त साधण्यात आलं. मूळ ‘हेरा फेरी’ २००० साली प्रदर्शित झाला आणि तुफान गाजला होता. पुढे २००६ मध्ये या ‘हेरा फेरी २’ आला आणि आता प्रेक्षक ‘हेरा फेरी ३’ नाही नाही ‘हेरा फेरी ४’ची आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचे शीर्षक नक्की काय आहे आणि यात खरंच संजू बाबा खलनायक साकारणार आहे का..? याबाबत लवकरच अधिकृत माहिती मिळेल अशी आशा आहे.

Tags: akshay kumarhera pheri 3Instagram Postparesh rawalSuniel ShettyUpcoming Bollywood FilmViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group