Take a fresh look at your lifestyle.

संजय लीला भन्साळी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या रिलीजसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा घेणार सहारा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाचा परिणाम शेअर मार्केट पासून अगदी मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्वत्र मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. संजय लीला भन्साळी यांनासुद्धा आपल्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाबाबत महत्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. कोरोनामुळे संजय लीला भन्साळी ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करू शकतात अशी चर्चा आहे. हा चित्रपट ३० जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार होता. मात्र महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. परिणामी त्यांना हा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो अशी चर्चा आहे.

खरंतर हा चित्रपट चित्रपटगृहातच प्रदर्शित करायचा होता, मात्र एकंदर परिस्थिती पाहता ते शक्य नसल्याचा अंदाज संजय लीला भन्साळींना येत आहे. त्यामुळे त्यांना ओटीटीचा सहारा घ्यावा लागू शकतो. कोरोनाच्या पार्शवभूमीवर अनेक निर्मात्यांनी आपल्य चित्रपटांच्या रिलीजची तारीख पुढे ढकलली आहे, त्यात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या ‘चेहरे’ या चित्रपटाचादेखील समावेश आहे. आता भन्साळी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करणार की परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर चित्रपटगृहात, हे ते स्वतःच सांगू शकतात.

गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात आलिया भट्ट हि मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात ती गंगुबाईंची मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. काही आठवड्यांपूर्वी आलियाची कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. ज्यामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले होते. आता ती बरी झाल्यानंतर लवकरच चित्रपटाचे उर्वरित शूटिंग पूर्ण करणार आहे. या चित्रपटाच्या थिएटर रिलीजबद्दल ती अत्यंत उत्साही आहे. मात्र भन्साळींनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा सहारा घ्यायचे ठरवले, तर आलियाच्या उत्साहाचे काय?