Take a fresh look at your lifestyle.

ऑस्कर’सोहळ्यात राडा! आधी अँकरला कानशिलात.. नंतर माफी; विल स्मिथचा अंदाज चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच पार पडलेला ९४ वा ऑस्कर पुरस्कार हा चांगलाच चर्चेत आहे. याचे कारण ठरलाय विल स्मिथचा अंदाज. त्याच झालं असं कि, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अभिनेता विल स्मिथ हा सुत्रसंचालक क्रिस रॉकवर अचानक चिडला आणि त्याने थेट स्टेजवर जाऊन त्याच्या कानशिलात लगावली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. मात्र यानंतर विल स्मिथने स्टेजवर संपूर्ण सोहळ्यात उपस्थित असलेले मान्यवरांची आपण केलेल्या कृतीबद्दल माफी मागितली. त्याचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना प्रचंड भावला आहे. पण तो चिडला का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

तर झालं असं कि, सूत्र संचालक क्रिस रॉकने इतक्या भव्य सोहळ्यात विल स्मिथच्या पत्नीवर विनोद केल्यामुळे त्याचा पारा चढला आणि थेट स्टेजवर जाऊन त्याने क्रिसच्या कानशिलात लगावली. क्रिसने G.I. Jane सिनेमावरून विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची मस्करी केली. दरम्यान तो म्हणाला, ‘G.I. Jane सिनेमात जेडाला टक्कल असल्यामुळे घेतलं होतं. पण खरंतर जेडाने सिनेमासाठी टक्कल केलं नसून, तिला एक आजार आहे. त्या आजाराचं नाव आहे Alopecia. यामुळे तिचे केस सतत गळत असतात. म्हणून जेडाने स्वतःचे केस स्वतःच कापले आहेत. दरम्यान, पत्नीवर विनोद केल्यामुळे स्मिथ चिडला आणि त्याने शिविगाळ करत होस्ट क्रिसच्या कानशिलात लगावली.

सध्या स्मिथ आणि क्रिसचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. क्रिसच्या कानशिलात लगावल्यानंतर स्मिथ म्हणाला कि, ‘माझ्या पत्नीबद्दल पुन्हा असं बोलू नकोस…’ यावर क्रिस म्हणाला, ‘नाही बोलणार…’. यानंतर पुरस्कार स्विकारल्यानंतर मात्र विल स्मिथने उपस्थितांची माफी मागितली. दरम्यान अॅकॅडमीची माफी मागताना तो म्हणाला कि, क्रिस रॉकने G.I Jane 2 या चित्रपटाबाबत बोलताना विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची मस्करी केली होती. त्यामुळे मी त्याच्या कानाखाली मारली आणि यासाठी मी अॅकॅडमीची माफी मागतो. माझ्यासोबत नामांकन मिळालेल्या स्पर्धकांची आणि उपस्थित मान्यवरांची मी माफी मागतो. कारण हे खुप चांगले क्षण आहेत आणि माझ्यामुळे जे झालं त्यासाठी माफी मागतो.