Take a fresh look at your lifestyle.

विल स्मिथने पटकावला बेस्ट अॅक्टरचा OSCAR पुरस्कार; भावुक होत मानले चाहत्यांचे आभार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरातील सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनास्पद पुरस्कार म्हणून ऑस्कर सोहळ्याचा उल्लेख केला जातो. यंदाचं ऑस्कर २०२२ लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये २७ मार्च २०२२ रोजी मोठ्या जल्लोषात पार पडला. दरम्यान अनेक दिग्गज मंडळी मोठ्या संख्येने या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा ९४ वा असून याबाबत विशेष उत्सुकता प्रत्येकालाच होती. हा मान हा पुरस्कार आपल्याला मिळावा असे प्रत्येकाला वाटत असताना यंदाचा ऑस्कर मात्र ‘किंग रिचर्ड’ या चित्रपटाने गाजवला. शिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून विल स्मिथला गौरविण्यात आले.

यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डय़ून’ चित्रपटाने सर्वाधिक ६ पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. तर ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीत द समर ऑफ सोलने ऑस्कर पुरस्कार पटकावला. या श्रेणीत ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. मात्र, या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आले. त्यासोबत किंग रिचर्ड या चित्रपटासाठी अभिनेता विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना स्मिथ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान तो म्हणाला, कोणतीही कला ही आयुष्याची कॉपी करत असते. मी रिचर्ड विलियम्ससारखा वाटतो. तो क्रेझी फादर असल्याचे मला वाटते.

अभिनेता विल स्मिथला पुरस्कार स्विकारताना अश्रू अनावर झाले. दरम्यान पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असणाऱ्यांनी विल स्मिथला स्टॅडिंग ओवेशन दिले आणि तो आणखीच गहिवरला. गतवर्षी १९ नोव्हेंबर २०२१ रोजी विल स्मिथचा ‘किंग रिचर्ड्स’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामावर आधारित असून याचे कथानक टेनिसपटू सेरेना, व्हीनस विल्यम्सचे वडील आणि प्रशिक्षक रिचर्ड विल्यम्स यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात विल स्मिथने प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच अनजानु एलिस, सानिया सिडनी, डेमी सिंगलटन, टोनी गोल्डविन आणि जॉन बर्नथल या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहेत. रेनाल्डो मार्कस ग्रीन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.