Take a fresh look at your lifestyle.

दगडू- पालवीची जादू चालली..; दोन दिवसांतच ‘टाईमपास 3’ने गाठला कोटींचा गल्ला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास’ आणि ‘टाईमपास २’ ने कहर केल्यानंतर आता ‘टाईमपास ३’ आपली जादू पसरविताना दिसतो आहे. मस्तीचा कल्ला आणि प्रेमाचा हल्लागुल्ला करत दगडू इज बॅक.. पण यावेळी दगडूसोबत प्राजक्ता नाही तर भन्नाट पालवी आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट विविध कारणांमुळे चर्चेत होता. यांनतर अखेर मराठी चित्रपट ‘टाईमपास ३’ प्रदर्शित झाला आहे आणि बॉक्स ऑफिसवर अवघ्या दोनच दिवसात चित्रपटाने भन्नाट कमाई केली आहे.

आतापर्यंत या चित्रपटातील गाणी, संवाद आणि कलाकारांची फेम सोशल मीडियावर धमाल करत होती. मुख्य म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अभिनेत्री हृता दुर्गुळे पालवीच्या जबरदस्त हटके भूमिकेत दिसते आहे. तर अभिनेता प्रथमेश परब हा आपल्या लाडक्या दगडूच्या भूमिकेत दिसतो आहे.

रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास ३’ हा गेल्या आठवड्यात शुक्रवारी म्हणजेच २९ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला रिलीज होऊन फक्त दोन दिवस झाले आहेत. तास प्रेक्षकांकडून या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळतान आहे. पण तरीही चित्रपटाचा कमाईचा गल्ला एक कोटीच्या पुढे गेलाय.

‘टाईमपास ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याने तब्बल ८० लाखांची कमाई केली. यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी त्यात वाढ झाली आणि अखेर रविवारनंतर या चित्रपटाची कमाई १ कोटी ९० लाखांच्याही वर गेली आहे.

आई बाबा आणि साई बाबा शपथ… नया है वह.. माझ्या बाबांना शाकाल बोललास.. असले भन्नाट डायलॉग्स, कमालीचं कॉमिक टायमिंग, थोडा लव्ह, थोडा इमोशन सगळं काही एका नव्या ढंगात या चित्रपटात दिसून आलं आहे. दगडूची हि नवी मैत्रीण आणि त्यांच्या प्रेमाला फुटलेली लव्हेबल पालवी चांगलीच हिट होणार असं दिसतंय.