Take a fresh look at your lifestyle.

विनामास्क फिरणाऱ्या भारती सिंगचा व्हिडिओ झाला वायरल; नेटकरी म्हणाले, नशा उतरला नाही का?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लाफ्टर क्वीन म्हणून स्वतःची वेगळी ओळख तयार करणाऱ्या भारती सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. या व्हि़डिओत भारती सिंग चक्क विनामास्क फिरतेय. जी इतरांना मास्क घालण्याचे धडे देतेय ती स्वतःच विनामास्क फिरतेय. हा व्हिडिओ पाहून नेटकाऱ्यानी कमेंट्समधून प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

भारती सिंगच्या या व्हिडिओत ती एका माणसाला मास्क नाही घातला का असे विचारताना दिसतेय. त्यावर तिच्या लक्षात येते की, त्याने मास्क घातला आहे उलट भारतीने मास्क घातलेला नाहीये. त्यावर लगेचच ती तिचा फॉक्रचा फ्रील तोंडावर घेताना दिसत आहे. या व्हिडिओत ‘अंकल को आपने डरा दिया’ असे एक फोटोग्राफर बोलताना दिसत आहे.

एकेवेळी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया हि जोडी प्रेक्षकांची अतिशय लाडकी जोडी म्हणून ओळखली जात होती. त्यांची केमिस्ट्री आणि त्यांच्यातील प्रेम, मजा मस्ती या कारणांमुळे दोघे सतत चर्चेत असायचे. मात्र काही काळापूर्वी दोघेही ड्रग्ज प्रकरणात सापडल्यामुळे चर्चेत आले आहेत. घरात गांजा सापडल्यानंतर एनसीबीने दोघांनाही अटक केली होती. यानंतर दोघेही जामिनावर सुटले.

ड्रग्स केसमध्ये अडकल्यानंतर भारती आणि हर्षला ब-याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोघांना भलेही जामीन मिळाला. तरी लोकांच्या मनात त्यांच्याविषयी राग बघायला मिळत आहे. भारतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर तिला याच कारणामुळे प्रचंड ट्रोल केले जात आहे. तुझा नशा अजून उतरला नाही का, तू मास्क घाल… अशाप्रकारचे कमेंट लिहून तिला सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेले नेटकरी चांगलेच सुनावताना दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.