Take a fresh look at your lifestyle.

‘स्त्रिया नेहमी बरोबर असतात’..सॉरी सोनाली! इंस्टावर व्हिडीओ पोस्ट करीत कुशलने मागितली माफी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता आल्यानंतर राज्यातील सर्व चित्रपट गृहे खुली करण्यात आली आहेत. यामुळे प्रेक्षकांना आपला विकें आणि फावला वेळ मस्त मजेत घालवण्यासाठी मनोरंजाची साथ लाभली आहे. कोविड नियमावलीनुसार लसीचे २ डोस पूर्ण झालेले सर्व प्रेक्षक आणि ५०% क्षमतेनुसार चित्रपटगृहात तुम्ही पुरेपूर चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. यानंतर थिएटरमध्ये सगळ्यात जोरात चालू असलेला मराठमोळा चित्रपट म्हणजे पांडू एकदम सुसाट चालू आहे. रिलीजनांतर अगदी काहीच दिवसात या चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे चित्रपटातील कलाकार नुसता कल्ला करत असून वारंवार चर्चेत आहेत. या चित्रपटात भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि सोनाली कुलकर्णी हे महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. सध्या या तिघांचा एक व्हिडीओ सोशलक मीडियावर वायरल होतोय आणि या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कुशलने चक्क सोनालीची माफी मागितली आहे. तर काय आहे कारण आपण जाणून घेऊया.

अभिनेता कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ पांडू चित्रपटाच्या प्रिमिअरचा आहे आणि यावेळी त्यांनी मजा आणि मनोरंजन म्हणून शूट केलेला हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओत भाऊ, कुशल आणि सोनाली तिघेही दिसत आहेत. हा व्हिडीओ शूट करताना मोबाईल आडवा धरायचा का उभा धरायचा यावरून सोनाली कुशल याची मजेशीर कुरबुर झाली. पण नेहमीप्रमाणे जिंकलं कोण? तर सोनाली. आणि व्हिडिओचं शूट उभ्या मोबाईलमध्ये केलं आणि हा व्हिडीओ जबरदस्त झाला. इतकंच काय तर वायरल सुद्धा झाला. म्हणून कुशल म्हणतोय स्त्रिया नेहमी बरोबर असतात.. सॉरी सोनाली.

 

हा व्हिडीओ पोस्ट करताना अभिनेता कुशल बद्रिकेने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओ मागे एखादी आठवण असतेच, हा व्हिडिओ आमच्या पांडू च्या प्रीमिअरच्या वेळेचा, हा व्हिडीओ काढताना माझ्या मध्ये आणि सोनाली मध्ये खूप चर्चा झाली, मी म्हणत होतो हा व्हिडीओ आपण आडवा शूट करू आणि सोनाली म्हणत होती हा व्हिडिओ आपण उभा शूट करू, फायनली माझ्या हट्टापायी हा एकदा आडवा शूट करण्यात आला आणि सोनालीच्या सजेशन प्रमाणे एकदा उभा शूट करण्यात आला आता हा पोस्ट करताना माझ्या लक्षात आलय, स्त्रिया नेहमी बरोबर असतात. सॉरी सोनाली. आणी हो अजुनही.. “पांडू जोरात, सिनेमा घरात “. बघुन घ्या की राव राह्यला असन तर.