Take a fresh look at your lifestyle.

शकुंतला देवींचा World Record; ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’कडून शिक्कामोर्तब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट ‘ह्युमन कॉम्प्युटर’ असा लौकिक मिळवणाऱ्या महान गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आश्चर्याची  बाब म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच संपूर्ण जगात याची चर्चा होऊ लागली आहे. कारण शकुंतला देवी यांना ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. यामुळे संपूर्ण जगातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

Guinness-book-of-World-Records[1].

दिवंगत शकुंतला देवी यांनी १८ जून १९८० साली ब्रिटनमधील इंपीरियल महाविद्यालयात २८ सेकंदात कुठल्याही १३ अंकी आकड्यांचे गुणाकार करुन दाखवले होते. तसेच त्यांनी काही सेकंदात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा विविध पद्धतीने त्यांनी आकडेमोड केली होती. या विक्रमासाठी त्यांना ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने गौरवण्यात आलं आहे. त्यांची मुलगी अनुपमा बनर्जी यांच्याकडे हा पुरस्कार सोपवण्यात आला.

‘शकुंतला देवी’ हा चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी अ‍ॅमेझॉन प्राइमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मानवी संगणक म्हणून ओळखल्या गेलेल्या शकुंतला देवी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. कोणतंही औपचारिक शिक्षण नसताना शकुंतलादेवी वयाच्या तिसऱ्या वर्षीच कोणतीही आकडेमोड झटक्यात  करू शकायच्या. गणिताचे जाहीर कार्यक्रम करण्यासाठी त्यांनी जगभर दौरे केले होते. गणिताचं त्यांचं कौशल्य पाहून भलेभले चकित होत होते. त्यांनी गणितावर, ज्याोतिषशास्त्रावर पुस्तकं लिहिली. २०१३ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

Comments are closed.

%d bloggers like this: