Take a fresh look at your lifestyle.

अरे वा !!! सोनू सूदने स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी ‘प्रवासी रोजगार’ या नावानी केल अ‍ॅप लाँच

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने लॉकडाउन जाहीर झाल्यापासून सातत्याने स्थलांतरित गरीब मजुरांची गावी पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्याच्या मदतीचा ओघ अजूनही सुरूच असून आता त्याने स्थलांतरित मजुरांच्या रोजगाराचीही व्यवस्था केली आहे. ‘प्रवासी रोजगार’ या नावाने त्याने अ‍ॅप लाँच केलं आहे. मजुरांना रोजगार शोधण्यासाठी आवश्यक असलेली माहिती व लिंक्स या अ‍ॅपवर मिळतील.

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूद म्हणाला, “या अ‍ॅपसाठी गेल्या काही महिन्यांपासून फार विचार, प्लॅनिंग व तयारी केली. दारिद्र्यरेषेखालील तरुणवर्ग, स्वयंसेवी संस्था, सल्लागार, स्टार्टअपचे तंत्रज्ञ, तळागाळावर काम करणाऱ्या संस्था आणि घरी परतण्यास मी मदत केलेल्या मजुरांशी सल्लामसलत केली.”

कापड व्यवसाय, आरोग्यसेवा, बांधकाम,अभियांत्रिकी, बीपीओ, सुरक्षा, ऑटोमोबाइल, ई-कॉमर्स या विविध क्षेत्रांतील ५०० कंपन्यांतील नोकरीच्या संधींची माहिती या अ‍ॅपद्वारे मिळेल.

लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित, गरीब मजुरांसाठी सोनू सूद ‘संकटमोचक’ म्हणून मदतीला धावून आला आहे. त्याच्या या कामाचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Comments are closed.