हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवर प्रसारित होणारी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या अत्यंत लोकप्रिय मालिकांच्या यादीत सर्वात वर आहे. खरंतर या मालिकेच्या निर्मात्यांनी मालिकेचा शेवट निश्चित करून मालिका बंद केली होती. मात्र प्रेक्षकांच्या इच्छेला मान देऊन हि मालिका पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मालिकेतील यश आणि नेहा हे प्रेक्षकांचे अतिशय लाडके जोडपे आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मालिकेशी असलेली रेशीमगाठ तोडायची नाही. त्यांना यश आणि नेहाचा फुलणारा संसार पहायचा आहे. आजच्या भागात यश आणि नेहा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले पहायला मिळणार आहेत. त्यांचा रोमँटिक प्रोमो देखील दोन दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलाय.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने निरोप घेता घेता पुन्हा एकदा चांगली भरारी घेतली. गेल्या काही आठवड्यापासून नेहा आणि यश यांच्या लव्हस्टोरीमध्ये आंबट गोड प्रसंग घडताना दाखवले आहेत. परीने तिला ताई म्हणेल असं कुणीतरी असावं अशी मागणी केल्यामुळे मालिकेला एक वेगळं वळण मिळालं आहे. अशातच यश आणि नेहाचा एक रोमॅंटिक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या रोमॅंटिक व्हिडिओला मालिकेच्या प्रेक्षकांनी तुफान पसंती दिली आहे
नेहा आणि यश म्हणजेच प्रार्थना आणि श्रेयसच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीवर प्रेक्षक फिदा आहेत. मध्यंतरी यश-नेहाच्या नात्यात दुरावा आला होता. पण आता तो दूर झाला असून आजच्या भागात त्यांचा रोमान्स पहायला मिळणार आहे. दोघांमध्ये आता जवळीक निर्माण झाली आहे. या व्हायरल प्रोमो व्हिडिओमध्ये यश आणि नेहा “और क्या” या सुपरहिट हिंदी गाण्यावर रोमान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
Discussion about this post