Take a fresh look at your lifestyle.

कोरोनामुळे प्रसिध्द अभिनेत्री दिव्या भटनागर हिचे निधन

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री दिव्या भटनागर (Divya Bhatnagar) हिचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दिव्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरु असतानाच तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

दिव्याचा मित्र युवराज रघुवंशी यांनी अभिनेत्रीच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्पॉब्वॉयशी झालेल्या संभाषणात युवराजने सांगितले की, ‘दिव्याचा मृत्यू सकाळी 3 वाजता झाला. दिव्याला 7 हिल्स रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री अडीच वाजता अचानक तिची तब्येत बिघडली होती, तीला श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यानंतर 3 वाजता डॉक्टरांनी सांगितले की, दिव्या आता या जगात नाही. ही बातमी माझ्यासाठी आणि दिव्याच्या कुटूंबासाठी मोठा धक्का आहे. तीच्या आत्माला शांती लाभो ‘.

दिव्याने यापूर्वी इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते, “हाय माय इंस्टाग्राम फॅमिली. माझ्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करा. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.