Take a fresh look at your lifestyle.

होय..मला बॉर्डरलाइन डिस्लेक्सिक हा आजार आहे; अभिनव शुक्लाची अर्ध्या रात्री केलेली पोस्ट चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस 14’मुळे अभिनेता अभिनव शुक्ला चांगलाच प्रकाशझोतात आला. यानंतर आता अभिनव ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे सध्या अतिशय चर्चेत आहे. मात्र सध्या तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. हे वेगळे कारण म्हणजे, त्याने रविवारी अर्ध्या रात्री केलेल्या पोस्टमधील विषय. होय, या पोस्टमध्ये अभिनवने असा काही खुलासा केला की, चाहते अवाक झाले. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या आजारपणाबद्दल स्पष्ट सांगितले आणि याचसोबत त्याने आता याविषयी लाज वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या २० वर्षांपासून अभिनव ‘बॉर्डरलाइन डिस्लेक्सिक’ या आजाराने ग्रस्त आहे आणि ही गोष्ट तो जगापासून सतत लपवण्याचा प्रयत्न करत असायचा. पण आता मात्र त्याने सद्यपरिस्थिती मान्य करीत लोकांनाही जाहीरपणे सांगितले कि, होय, मी ‘बॉर्डरलाइन डिस्लेक्सिक’ या आजाराने पीडित आहे. ‘बॉर्डरलाइन डिस्लेक्सिक’ हा आजार असलेल्या व्यक्तिला अंक अणि अक्षरं समजण्यास अडचणी येतात. बॉलिवूड चित्रपट ‘तारे जमीन पर’ हा याच आजारावर आधारित होता. यातील त्या लहान मुलाला हाच आजार असल्याचे दाखवले होते. याची लक्षणे कमी वयातच दिसू लागतात.

रविवारी रात्री १ वाजून ३८ मिनिटांनी अभिनवणे ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. यात त्याने लिहिले कि, ‘मला बॉर्डरलाइन डिस्लेक्सिक हा आजार आहे. आता हे सगळ्यांनाच कळालेच आहे. त्यामुळे मी आता यावर मोकळेपणाने बोलणार आहे. यात माझी वा अन्य कुणाचीही चूक नाही. पण तरीही हा आजार स्वीकारायला दोन दशकांचा काळ गेला. आता मला अंक वा आकड्यांमुळे लाजण्याची गरज नाही. मी या आजाराने पीडित आहे, हे सांगण्याची आता लाज वाटत नाही,’ असं लिहीत त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे.

अभिनवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करीत एक पोस्ट लिहिली आहे. यात त्याने लिहिले कि, ‘होय आकडे, अक्षरं आणि शब्दांमध्ये माझा गोंधळ होतो. मला तारीख, नाव शिवाय एखाद्या तारखेशी संबंधित गोष्टी लक्षात ठेवण्यास कठीण जाते. मात्र काही गोष्टींमध्ये मी परफेक्ट आहे. मला अनेक गोष्टी माझ्या गाडीच्या डिक्कीत ठेवायला सांगा. मी ते सर्व योग्यरित्या करू शकतो. मी काही गोष्टींमध्ये उत्तम आहे तर काहींमध्ये वाईट. या गोष्टी सुधारण्याचा मी सतत प्रयत्न करतोय.’