Take a fresh look at your lifestyle.

स्वीटू आणि नलूचा भन्नाट डान्स वायरल; पहा मायलेकींची ऑफस्क्रीन केमिस्ट्री

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ अगदी अल्पावधीतच अत्याधिक लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील सारे कलाकार मालिकेत जितके गंभीर आहेत, तितकेच ते रियल लाईफमध्ये बिनधास्त आणि धुडघूस घालणारे आहेत. मालिकेतील मुख्य पात्र स्वीटू आणि तिची आई नलू मालिकेत अगदी एकदम साध्या सोज्वळ दाखविण्यात आल्या आहेत. मात्र या दोघीही रियल लाईफमध्ये खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहेत. या दोघी मायलेकींच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीचा भन्नाट डान्स करतानाचा एक धम्माल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका प्रेक्षक अतिशय आवडीने पाहतात. आजकाल घराघरात हि मालिका पहिली जातेय. ओम आणि स्वीटूच्या लव्हस्टोरीने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे. हे कलाकार ऑनस्क्रीन जितके चर्चेत आहेत अगदी तितकेच ऑफस्क्रीन सुद्धा चर्चेत आहेत. शुटींगच्यावेळी अधेमध्ये जो रिकामा वेळ मिळतो तेव्हा हे कलाकार आपल्या आवडीच्या काही गोष्टी करत असतात. स्वीटू आणि नलू म्हणजेच अन्विता फलटणकर आणि दीप्ती केतकर या दोघींनाही डान्सची प्रचंड आवड आहे. त्यामुळे ह्या दोघीही सतत मिळेल त्या वेळेत धम्माल, मज्जा करत डान्स करत असतात आणि हे व्हिडीओ सोशल मीडियावरसुद्धा शेयर करत असतात.

नुकताच वायरल झालेला या दोघींचा एक धम्माल डान्स व्हिडीओ सध्या ट्रेंडिंग आहे. यामध्ये त्या दोघीही आपापला डान्स खुपचं एन्जॉय करताना दिसत आहेत. यावरून लक्षात येत की, या दोघीही फक्त उत्तम अभिनेत्री नव्हे तर उत्तम डान्सरसुद्धा आहेत. त्यांचा हा डान्स व्हिडीओ पाहून या व्हिडीओवर चाहत्यांकडून भरभरून कमेंट्स आणि लाईक्स मिळत आहेत. चाहते दोघींचेही नेहमीच कौतुक करत असतात. लाईक्स आणि कमेंट्स देऊन ते आपल प्रेम व्यक्त करत असतात तसेच या व्हिडीओवरही त्यांनी प्रचंड प्रेम केले आहे. नलू आणि सरू मालिकेमध्ये मायलेकीच्या गोड नात्याचे प्रकटीकरण करताना दिसतात. त्यांची हि जोडी अव्वल आहे. जशी ऑनस्क्रीन तशीच ऑफस्क्रीनसुद्धा.