Take a fresh look at your lifestyle.

‘योग योगेश्वर जय शंकर’; कलर्स मराठी घेऊन येतेय आणखी एका पौराणिक कथेचा उलघडा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी हि एक अशी वाहीनी आहे ज्या वाहिनीवर गेल्या काही काळात अशा अनेक मालिका पाहायला मिळाल्या ज्यांचे कथानक हे ऐतिहासिक आणि पुराणिक कथांशी संबंध ठेवते. तसे पाहता अन्य बऱ्याच वहिनींवर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. पण पौराणिक कथांचा एक वेगळाच आलेख हा कलर्स मराठीने तयार केला आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवर आधारित मालिकांच्या निर्मितीत भर पडल्याचं दिसून येत आहे. मुख्य म्हणजे या मालिकांना प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद दिसून येतो. त्यामुळे नक्कीच पडद्यामागील कलाकारांना काम करण्यासाठी उत्साह येतो. बाळुमामाच्या नावानं चांगभलं, जय जय स्वामी समर्थ या मालिकांच्या यशानंतर आता कलर्स मराठी योग योगेश्वर जय शंकर हि नवी मालिका घेऊन येत आहे.

सध्या कलर्स मराठीवर ‘जय जय स्वामी समर्थ’ ही पौराणिक मालिका सुरु आहे. या मालिकेचा प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे. तर बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेचा देखील फार विशेष आणि मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या मालिकांमध्ये संत महात्मांच्या जीवनावर भाष्य करणारे कथानक अत्यंत उत्कृष्टरित्या मांडण्यात आले होते. विशेष म्हणजे या पौराणिक मालिकांच्या यादीत आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचा सर्व प्रेक्षकांना आनंद आहे.

 

नवी मालिका ‘योग योगेश्वर जय शंकर’ या मालिकेत योग्य योगेश्वर श्री महाराजांच्या जीवनाचा प्रवास उलगडला जाणार आहे. कलर्स मराठीने नुकताच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमो व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ”कारुण्य सिन्धु भव दुःखहारी, तुजवीण शंभो मजकोण तारी। सुरु होतोय योग योगेश्वर श्री शंकर महाराजांचा जीवनअध्याय”. मालिकेच्या प्रोमोनंतर प्रेक्षकांमध्ये मालिका कधी सुरु होणार याबाबत उत्सुकता आहे. तर यावर प्रेक्षकांनी कमेंटमध्ये लिहिले आहे कि, धन्यवाद कलर्स मराठी बाळू मामा, स्वामी समर्थ….आणि आता ही सिरियल …खूप काही शिकायला मिळतं….. अश्याच देवाच्या सीरिअल काढत जावा. अद्याप या मालिकेतील पात्रांविषयी कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही. मात्र या मालिकेतून आणखी एका श्रद्धात्मक कथेचा भाग आपणा सर्वाना होता येईल इतकेच खूप आहे अश्या भावना प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.