Take a fresh look at your lifestyle.

‘तू मेरा है और…’; सिद्धार्थच्या निधनानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्यक्त झाली शेहनाज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वाला चटका लावणारी एक एक्झिट म्हणजे लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ल याचे निधन. दोन सप्टेंबरला सिद्धार्थने जागाच निरोप घेतला आणि अनेको चाहत्यांना मोठा धक्का दिला. त्याच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. बॉलीवूडच्या दिग्गज सेलिब्रेटींपासून मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांनी सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली होती. या सगळ्यात त्याची अत्यंत जवळची मैत्रीण शहनाज गिल मोठ्या मानसिक धक्कात गेली होती. तिची अवस्था पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते. मात्र आता कुठे शेहनाज या धक्क्यातून सावरताना दिसतेय. दरम्यान सिद्धार्थच्या जाण्यानंतर तिने पहिल्यांदाच सोशल मीडियावर सिद्धार्थशी संबंधित पोस्ट केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून पुन्हा एकदा सिडनाझची आठवण करून दिली आहे.

आपल्या कणखर भूमिकेमुले सिद्धार्थ अत्यंत लोकप्रिय होता. दरम्यान त्याचे अचानक निधन होणे हे अगदीच अमान्य होते. पण नियतीला जे मंजूर तेच घडते. त्याच्या निधनाचे कारण हे हार्ट अटॅक असून एका रात्रीत सिद्धार्थ कायमचा दूर झाला. त्याच्या जाण्यानं चाहत्यांना आणि शेहनाजला मोठा धक्का बसला होता. बिग बॉसचा विजेता म्हणून लोकप्रिय झालेल्या सिद्धार्थने या शोमधून अमाप लोकप्रियता मिळवली. यात त्याची आणि शहनाज गिलची एक वेगळीच गोड केमिस्ट्री पहायला मिळाली होती. पण सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज पुन्हा हसताना दिसली नाही. यानंतर काही दिवसांपूर्वी शहनाज गिलचा मित्र दिलजीत दोसांज याच्यासोबत ती तिच्या नव्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली. यानंतर आता तिने सोशल मीडियावर सिद्धार्थशी संबंधित पोस्ट शेअर करीत त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

https://twitter.com/viralbhayani77/status/1453613412483743744/photo/1

या पोस्टमध्ये शहनाजने सांगितलं की, आपण एक गाणं रिलीज करणार आहोत. ते गाणं तिचा दिवंगत मित्र सिद्धार्थ शुक्ला याच्यासाठी असणार आहे. सोबतच तिने कॅप्शनमध्ये तू मेरा है और.. असे लिहिले आहे. बिग बॉस मध्ये असताना ती नेहमी सिद्धार्थला तू मेरा है और तू मेरा हि रहेगा असे म्हणताना अनेकदा दिसली. पण सिद्धार्थच्या निधनानंतर या वाक्यात आलेला भावनिक तुटकपणा दिसून आला आहे. सिद्धार्थच्या जाण्यानंतर शहनाजची ही पहिली पोस्ट असल्यामुळे सर्वांचे लक्ष या पोस्टने वेधून घेतले. बिग बॉसचा १३ हा सीझन संपला आणि त्यानंतर शहनाजने वेळोवेळी आपल्या प्रेमाची जाहीर कबूली दिली होती. त्यानंतर तिला आणि सिद्धार्थला #सिडनाज या नावानं ओळखलं जात होतं. ते या नावानं सोशल मीडियावर लोकप्रियही होते. मात्र काळानं सिद्धार्थवर घाला घातला आणि एक प्रेमकहाणी कायमची अपूर्ण राहिली.