Take a fresh look at your lifestyle.

‘तू माझा पार्टनर आहेस…’; तेजश्री प्रधानची आशुतोषसाठी केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

0

हॅलो बॉलिवुड ऑनलाईन। अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता आशुतोष पत्की हे दोघेही झी मराठीवरील लोकप्रिय ठरलेली मालिका ‘अग्गंबाई सासुबाई’च्या माध्यमातून एकाच स्क्रीनवर एकत्र दिसले होते. या मालिकेतून शुभ्रा म्हणून तेजश्रीने तर बबड्या म्हणून आशुतोषने प्रेक्षकांच्या घराघरांत आणि मनामनांत जागा मिळवली. मालिका संपूर्ण बराच काळ लोटला असला तरीही प्रेक्षकांच्या आठवणीत शुभ्रा आणि बबड्याची जोडी आहेच. कारण अनेकदा हि जोडी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. नुकतीच तेजश्रीने आशुतोष साठी केलेली एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. शिवाय यावर बरेच तर्क वितर्क लावले जात आहेत.

खरतर तेजश्रीने केलेल्या पोस्टमागे तीच खास उद्देश्य असं होत कि आशुतोषचा वाढदिवस. होय . आशुतोषच्या वाढदिवसाचं निमित्त म्हणून शुभ्राने अर्थात तेजश्रीने एक पोस्ट केली आणि ती पोस्ट चांगलीच व्हायरल झाली ती तू माझा पार्टनर आहेस या एकमेव वाक्यामुळे. या पोस्टमध्ये तेजश्रीने लिहिले आहे कि, वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या कामातील पार्टनर….क्राईम पार्टनर….क्रिएटिव्हीटी….फाईट..लाफटर…गॉसिप..जवळ जवळ सर्वच चांगल्या वाईट गोष्टींमध्ये तू माझा पार्टनर आहेस. तेजश्रीने या पोस्टसोबत एकमेकांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

तेजश्रीच्या या पोस्टवर आशुतोष पत्कीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होतच आहे. शिवाय या पोस्टवर अनेक नेटकरी विविध चर्चा रंगवताना दिसत आहेत. आता तर्क लावायला थोडीच यांना सांगावं लागत. पण काही म्हणा रील लाईफपेक्षा जास्त हि जोडी रिअल लाईफमध्ये चांगलीच चर्चेत असते नाही का? सध्या दोघेही आपल्या करिअर वर फोकस करीत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. तर सोशल मीडियावर नेहमीच यांच्याविषयी काही ना काही चर्चा होत असते. अनेक चाहत्यांनी तुम्ही दोघे एकत्र या ना.. अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आपली इच्छा व्यक्त केली आहे.